सांगली, 3 जुलै: ग्राहकांना आवश्यक वस्तू एकाच छताखाली मिळणारी मॉल संस्कृती अलिकड़े वाढत आहे. मात्र, सांगलीत असं एक मार्केट असून इथं अगदी बाळाच्या लंगोट्यापासून ते ब्लेझरपर्यंत आणि मोबाईल चार्जरपासून एअर कंडिशनरपर्यंत सर्व वस्तू एकाच छताखाली मिळतात. सर्वांना परवडणाऱ्या दरात वस्तू मिळवण्याचं ठिकाण म्हणूनच गणेश मार्केटची ओळख आहे. त्यामुळे सर्व आर्थिक वर्गातील लोक या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात.
कसे तयार झाले गणेश मार्केट? सांगलीत गणेश मार्केट सर्वांना परवाडणारे आणि ब्रँडेड वस्तू मिळवण्याचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. या गणेश शॉपिंग मार्केटची कहाणी मोठी रंजक आहे. सांगलीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्याला प्रमुख पाहुण्या म्हणून भारताच्या तत्कालीन राष्ट्पती प्रतिभाताई पाटील सांगलीत येणार होत्या. त्यावेळी सांगली शहराचे सुशोभीकरण महापालिकेकडून सुरू करण्यात आले. त्याकाळात सांगली शहरात खोक्यांचे अक्षरशः साम्राज्य होते. शहरात अगदी कुठेही पानपट्टी सुरू केली जात असे. इतकी बकाल अवस्था सांगलीत होती. त्यात सुधारणा होण्यासाठी महानगरपालिकेने या सर्व छोट्या मोठ्या खोकेधारकांना एकत्रितपणे या शॉपिंग सेंटरमध्ये जागा दिल्या. अंगावर काढू नका, पावसाळ्यात फिट राहण्यासाठी हे करा, डॉक्टरांनीच दिला सल्ला एकाच मार्केटमध्ये 200 दुकाने महापालिकेने पानपट्टी आणि टपरी चालकांना महात्मा गांधी चौकात जागा दिली. या ठिकाणी एक मोठं शॉपिंग मार्केट तयार करण्यात आलं. सांगलीतील सध्याचं प्रसिद्ध असणारं गणेश मार्केट अशा पद्धतीनं सुरू झालं. यामध्ये सुमारे 200 दुकाने आहेत. या दुकानांमधून मोबाईल चार्जर पासून एअर कंडिशनर पर्यंत सर्व वस्तू एकाच छताखाली मिळतात. या 200 दुकानांत चपला, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, स्टेशनरी, शालेय साहित्य आदी सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात. विशेष म्हणजे ब्रँडेड वस्तूही या ठिकाणी स्वस्तात मिळत असल्याची भावना सांगलीकर व्यक्त करतात.