सांगली, 02 फेब्रुवारी : सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलीचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही घटना काल (दि.01) रात्रीच्या सुमारास घडल्याचे बोलले जात आहे. अल्पवयीन प्रेमी युवक आणि युवती हे मोटारसायकलसह विहिरीत पडल्याने युवतीचा पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची प्राथमीक माहिती समोर आली आहे. या दरम्यान युवकाला पोहायला येत असल्याने युवक वाचला आहे. ही हृदयद्रावक घटना तासगाव तालुक्यातील एका गावात घडली. दरम्यान या घटनेमुळे खळबळ माजली आहे. या घटनेची तासगाव पोलिस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे.
या बाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, या घटनेतील अल्पवयीन युवक हा तालुक्यातीलच एका गावातील आहे. तर त्याची मावशी तालुक्यातील एका गावात राहते. काही कारणाने त्याचे मावशीकडे जाणे-येणे होते. मावशीच्या जवळपास ती युवती राहत होती. यातुन त्याचे त्या मुलीशी सूत जमले.
हे ही वाचा : प्रेग्नंट बहिणीच्या मदतीला आलेल्या मुलीसोबत मेहुण्याकडून धक्कादायक कृत्य, अमरावती हादरलं!
यातून त्यांच्यात भेटीगाठी सुरू झाल्या. सोमवारी मध्यरात्री या प्रेमी युगलाची भेट झाली. त्यांनी गावाबाहेर जाऊन निवांत ठिकाणी जाऊन बसण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हे अल्पवयीन प्रेमी युगल गावाशेजारच्या मोकळ्या जागी जाऊन बसले.
काही वेळानंतर त्या युवतीला घरी सोडण्यासाठी युवक त्या युवतीला मोटार सायकल वरून घेउन निघाला. यावेळी वाटेत अंधार असल्याने युवकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने रस्त्या शेजारी असणाऱ्या विहिरीत ते दोघेजण मोटारसायकलसह कोसळले.
हे ही वाचा : नवऱ्याला सोडलं अन् तिने मैत्रिणीच्या 14 वर्षांच्या मुलाला पकडलं, 3 वर्ष नको ते केलं, अखेर...
युवकाला पोहता येत असल्याने तो बचावला व अंधाऱ्या रात्री तो विहिरी बाहेर आला. पण त्या युवतीला पोहता येत नसल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर युवतीच्या पालकांनी तासगाव पोलिसात संबंधित युवकांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे अशी माहीती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेळके यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.