मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /प्रेग्नंट बहिणीच्या मदतीला आलेल्या मुलीसोबत मेहुण्याकडून धक्कादायक कृत्य, अमरावती हादरलं!

प्रेग्नंट बहिणीच्या मदतीला आलेल्या मुलीसोबत मेहुण्याकडून धक्कादायक कृत्य, अमरावती हादरलं!

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

'साली आधी घरवाली' असे चेष्टेने अनेकदा म्हटले जाते. मात्र, कलियुगात याच म्हणीचा अर्थ पूर्ण करण्याचा प्रयत्न एका मेहुण्याने केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Amravati, India

अमरावती, 1 फेब्रवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अनैतिक संबंध, बलात्कार, आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका मेहुण्याने आपल्या मेव्हणीचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

'साली आधी घरवाली' असे चेष्टेने अनेकदा म्हटले जाते. मात्र, कलियुगात याच म्हणीचा अर्थ पूर्ण करण्याचा प्रयत्न एका मेहुण्याने केला आहे. 22 जुलै ते 20 ऑगस्ट 2022 या काळात एका मेहुण्याने अल्पवयीन मेव्हणीचे लैंगिक शोषण केले. यातून तिला गर्भधारणा झाली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ब्राह्मणवाडा थडी पोलिसांनी याच हद्दीत राहणाऱ्या एका 40 वर्षीय अनिल नावाच्या जावयाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर बलात्कार, पोक्सो व अॅट्रॉसिटीअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एका 17 वर्षीय मुलीने फिर्याद दिली. पीडित मुलगी ही आरोपीची सख्खी मेव्हणी आहे. आरोपीची पत्नी गर्भवती होती. त्यामुळे घरकाम करण्याकरिता पीडिता तिच्या बहिणीच्या घरी आली होती. याचदरम्यान, 22 जुलै 2022 रोजी आरोपीने अल्पवयीन मेव्हणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने वेळोवेळी तिचे लैंगिक शोषण केले तसेच घटनेची वाच्यता केल्यास बहिणीला घरातून हाकलून देईल आणि तुला व तुझ्या बहिणीला मारून टाकेल, अशा प्रकारची धमकीही दिली.

हेही वाचा - पालघर : चारित्र्याचा संशय पत्नीसोबत पतीचं धक्कादायक कृत्य, चिमुकल्यांनी फोडला टाहो

याप्रकाराने पीडिता ही घाबरली होती. तिने ही बाब कुणाला सांगितली नाही. मात्र, 20 जानेवारीला तिचे पोट दुखत असल्याने तिची आई तिला एका खासगी दवाखान्यात घेऊन गेली. यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली असता, ती गर्भवती असल्याचे समोर आले. या धक्कादायक प्रकारानंतर तिच्या घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आली. याप्रकरणी घटनास्थळ ज्या पोलिसांच्या हद्दीत येते, त्या ब्राह्मणवाडा थडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र, नात्याला काळीमा फासल्याच्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Amravati, Crime news, Police, Rape