स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 6 एप्रिल: जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील एका बंदीला कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. सांगली कारागृह प्रशासनाने तातडीने त्याच्या संपर्कातील अन्य बंदीची तपासणी केली आहे. दरम्यान, कोरोनाची लागण झालेल्या बंदीला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले. कोरोना लाटेत संसर्ग रोखण्यात यश कोरोनाच्या पहिल्या लाटेत येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात अनेक बंदींना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर प्रशासनाने तातडीने स्वतंत्र अलगीकरण कक्ष स्थापन केला होता. त्यावेळीही कारागृह हाऊसफुल्ल असतानाही कोरोना संसर्ग रोखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले. त्यानंतर कारागृहात संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली.
कोरोनाचा पुन्हा शिरकाव गेल्या काही दिवसांत कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्या सुरूवात केली आहे. काही दिवसांपुर्वी सांगली शहरातील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर महापालिका आणि जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना सुरूवात करण्यात आल्या आहे. येथील कारागृहात नुकताच दाखल झालेल्या बंदीला अस्वस्थ झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. Dog Bite : कुत्रा चावल्यानंतर दुर्लक्ष केल्यास होतील गंभीर परिणाम! तातडीनं करा ‘हे’ उपाय, Video संपर्कातील कैद्यांची तपासणी कारागृह प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह कैद्याच्या संपर्कात आलेल्यांची आज तातडीने तपासणी करण्यात आली. अद्याप तरी एकच रुग्ण असून त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, येथील जिल्हा कारागृहात 419 पुरूष आणि 15 महिला बंदी आहेत. गेल्या काही दिवसांपासून कारागृहाची क्षमता फुल्ल झाली आहे. वाढत्या संसर्गात दक्षता घेणे गरजेचे आहे. याबाबत कारागृह प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना तातडीने केल्या जात आहे.