विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी नाशिक 5 एप्रिल : कुत्रा हा सर्वाधिक घरांमध्ये आढळणारा पाळीव प्राणी आहे. अनेकांसाठी कुत्रा हा त्यांच्या घरातील सदस्य असतो. ते त्याच्याबरोबर दिवसातील बराच वेळ घालवतात. त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या ही मोठी आहे. पाळीव आणि मोकाट या दोन्ही प्रकारच्या कुत्र्यांमध्ये ते चावा घेण्याची शक्यता ही असते. तुम्हाला कुत्रा चावला तर त्याकडं दुर्लक्ष करू नका. याबाबत तातडीनं डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार घ्या. अन्यथा, तुम्हाला जीव गमावावा लागू शकतो, असा इशारा नाशिकच्या डॉक्टरांनी दिला आहे. दुर्लक्ष पडेल महाग ‘अनेक जण कुत्रा चावल्यानंतर त्याकडं दुर्लक्ष करतात. आपल्याला काहीच होणार नाही, अशी त्यांची समजूत असते. ही साफ चुकीची समजूत आहे. कुत्रा चावल्यानंतर तुम्ही काहीही उपचार केले नसतील तर तब्बल 20 वर्षांनी देखील तुम्हाला रेबीज आजाराची लागण होऊन त्यामध्ये तुमचा जीव जावू शकतो, त्यामुळे याबाबत तातडीनं उपचार घ्या,’ असा इशारा डॉक्टर संजय रकींबे यांनी दिला आहे.
‘हे’ उपचार करा ‘कुत्रा चावलेली जखम स्वच्छ पाण्याने तात्काळ धुवून घ्या. साबण किंवा डेटॉल असेल त्याचा वापर करू शकता. या जखमेवर हळद भरू नका,जखम मोकळी ठेवा. रक्तस्राव होत असेल तर डॉक्टर जे उपचार करतील ते करूद्या. तुम्ही अजिबात जखम बांधू नका. त्यामुळे जखमेतील व्हायरस बाहेर जाईल. डॉक्टरांच्या सल्ल्यानं अँटी रेबीज व्हॅक्सिन घ्या. या काळात तेलकट, दुधकट पदार्थ खायचे की नाही हा प्रश्न अनेकांना पडतो. पण ते पदार्थ तुम्ही खाऊ शकता बऱ्याच वेळा पाळीव कुत्रा चावला की त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. पाळीव कुत्र्याने काही होत नाही. आम्ही त्याला इंजेक्शन दिलं आहे, अशी अंधश्रद्धा असते. पण, तसं दुर्लक्ष अजिबात करू नका. पाळीव किंवा कोणताही कुत्रा असेल तरी लगेच उपचार घ्या. कुत्रा कमी चावला की जास्त चावला याचाही विचार करू नका, कुत्र्याच्या लाळेमधील व्हायरसनं रेबिज आजार होतो,’ अशी माहिती डॉ. रकींबे यांनी दिली आहे. जगातील सर्वात खतरनाक श्वानासह Dog show मध्ये पोहोचला तरुण अन्…; थरकाप उडवणारा VIDEO कुत्रा चावला की काही रुग्णांना लगेच लक्षण दिसत नाही. चार आठ दिवसांनी लक्षण दिसतात. तुम्ही यावर उपचार घेतले नाहीत तर दहा किंवा पंधरा वर्षांनी देखील त्रास होऊ शकतो, असंही डॉ. रकींबे यांनी यावेळी स्पष्ट केलं.