स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 25 जून: जगभरात हवेच्या प्रदूषणात सातत्याने वाढ होत असल्याची तक्रार आपण नेहमीच ऐकतो. पण महाराष्ट्रातील शहरांबाबत दिलासादायक वृत्त आहे. नुकतेच केंद्रीय प्रदूषण मंडळाने एक अहवाल जाहीर केला. यात काही शहरांच्या प्रदूषण स्तरात घट होत चालल्याची नोंद करण्यात आली आहे. यात सांगलीकरांसाठी अभिमानास्पद बाब अशी आहे की, या अहवालात सांगलीची हवा सर्वात चांगली असल्याचे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातील हवा प्रदुषणात घट होतेय वाढत्या औद्योगिकरणामुळे, वाहतुकीमुळे, शहरांच्या प्रदूषण पातळीने कमालीची मर्यादा ओलांडली होती. दिल्ली आणि महाराष्ट्रातील मुंबईतील चेंबूर सारख्या ठिकाणी तर गॅस चेंबरसारखी अवस्था झाली होती. सकाळच्या वेळी हे प्रदूषण अगदी धुक्यासारखे पसरलेले डस्ट अशी परिस्थिती हाती. पण आता महाराष्ट्रातील प्रदूषण नियंत्रणात येऊ लागले असल्याचे चित्र आहे. नुकताच केंद्रीय प्रदूषण मंडळाने जो अहवाल प्रसिध्द केला आहे त्यानुसार महाराष्ट्रातील प्रदूषण पातळीत घट होऊ लागली आहे.
सांगली सर्वात आरोग्यदायी शहर सांगली जिल्ह्यातील प्रदूषण राज्याच्या तुलनेत अगदी कमी असून राज्यातील सर्वात आरोग्यदायी हवा सांगलीची असल्याचा उल्लेख केंद्रीय प्रदूषण मंडळाने केला आहे. ही सांगलीकरांच्या दृष्टीने अगदीच अभिमानास्पद बाब आहे. हवेचे प्रदूषण मोजण्यासाठी जो मापदंड वापरला जातो त्यानुसार 0 ते 50 या स्तरातील हवा सर्वात चांगली समजली जाते. येथील पर्यावरणात भरपूर ऑक्सिजन देणारी झाडे मोठ्या प्रमाणात असतात. तसेच तेथील औद्योगिक संस्थाही प्रयत्न पूर्वक हवेत कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड सारख्या वायूंचे हवेत उत्सर्जन करणे टाळण्यासाठी प्रयत्न करतात. तेथील प्रदूषणाची पातळी आटोक्यात असते. सांगली, कोल्हापुरातील हवेची गुणवत्ता चांगली महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश हेल्दी शहरांमध्ये होतो. या दोन्ही जिल्ह्यामध्ये मानवनिर्मित अभयारण्ये आहेत. तेथे काही सामाजिक कार्यकर्ते व संघटनांनी प्रयत्नपूर्वक केलेल्या वृक्षारोपण मोहिमेमुळे या जिल्ह्यातील हवेची गुणवत्ता सर्वाधिक आहे. ही दोन्ही शहरे 0 ते 50 च्या स्तरात आहेत. भुंकणारे हरीण’ कधी पाहिलंय का? महाराष्ट्रात या ठिकाणी खास सफारी 11 शहरांतील हवा समाधानकारक 51 ते 100 या इंडेक्स मधील हवा समाधानकारक समजली जाते. महाराष्ट्रातील 11 शहरे या इंडेक्समध्ये बसतात. अशी चांगल्या हवेची शहरे म्हणजे राज्यातील जवळपास 11 शहरांमधील हवा समाधानकारक आहे. तेथील हवेची गुणवत्ता 51 ते 100 इंडेक्सच्या दरम्यान आहे. त्यामध्ये पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, पिंपरी, अकोला, औरंगाबाद, अमरावती, जालना, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. हवेची गुणवत्ता कशी मोजतात? केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या अहवालानुसार चांगली हवा ही 0 ते 50 च्या दरम्यान नोंदली जाते. त्याला हवेची समाधानकारक गुणवत्ता म्हटले जाते. तिथे मानवी आरोग्याला अपायकारक असे प्रदूषण नसते. तेथील नागरिकांना आरोग्याचा धोका नसून, शुद्ध हवेत श्वास घेता येतो. अशा ठिकाणच्या नागरिकांना दमा, ब्रॉंकेटिक्स सारखे श्वसनाचे रोग होण्याची शक्यता फारच कमी असते. त्यानंतर 50 ते 100 दरम्यान हवेची पातळी नोंदली गेली. तर ती समाधानकारक समजली जाते. 30 चं ॲव्हरेज, 500 किलो वाहण्याची क्षमता, शिक्षकाने भंगारातून तयार केली जु’गाडी’ VIDEO अशा शहरांना प्रदुषित मानले जाते हवेची गुणवत्ता शंभरच्या वर गेली तर ती आरोग्यासाठी योग्य नसते. अशा शहरांना प्रदूषित शहर असे म्हटले जाते. अशा ठिकाणी नियोजनपूर्वक वृक्षलागवड करणे, विद्यार्थ्यांच्यात पर्यावरणपूरक दृष्टिकोन रुजवणे, औद्योगिक संस्थांवर प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करणे हे उपाय योजून प्रदूषण नियंत्रण करणे शक्य आहे.