मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Sangli Bus Accidnet : एसटी चालवत असताना चालकाला आली चक्कर, पुढे जे घडलं ते धक्कादायक!

Sangli Bus Accidnet : एसटी चालवत असताना चालकाला आली चक्कर, पुढे जे घडलं ते धक्कादायक!

वाहकाने प्रसांगवधान राखत बसचे स्टेअरिंग आपल्या हातात घेत बस कंट्रोल केलीय. त्यामुळे चालक-वाहकासह तब्बल ३० जणांचे प्राण वाचले आहेत.

वाहकाने प्रसांगवधान राखत बसचे स्टेअरिंग आपल्या हातात घेत बस कंट्रोल केलीय. त्यामुळे चालक-वाहकासह तब्बल ३० जणांचे प्राण वाचले आहेत.

वाहकाने प्रसांगवधान राखत बसचे स्टेअरिंग आपल्या हातात घेत बस कंट्रोल केलीय. त्यामुळे चालक-वाहकासह तब्बल ३० जणांचे प्राण वाचले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Sangli, India

सांगली, 11 डिसेंबर : सांगलीच्या खानापूर तालुक्यातील भिवघाटजवळ धक्कादायक घटना घडली. एस टी बस चालवत असतानाच बस चालकाला अचानक चक्कर आली. शेजारीच असणाऱ्या वाहकाने प्रसांगवधान राखत बसचे स्टेअरिंग आपल्या हातात घेत बस कंट्रोल केलीय. त्यामुळे चालक-वाहकासह तब्बल ३० जणांचे प्राण वाचले आहेत.

परळी-चिपळूण ही बस प्रवाशी घेवून भिवघाटमार्गे विट्याकडे येत होती. परंतू ती येत असतानाच चालकाला अचानकच चक्कर आली. अचानक असे काय झाले म्हणून बसमधील सर्व प्रवाशी भयभीत झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून शेजारीच वाहक कम चालक असणाऱ्या कंडक्टरने बसचा ताबा घेतला आणि बस बाजूला घेतली.

हे ही वाचा : जागतिक लोकसंख्येनं गाठला आठ अब्जांचा टप्पा; 'या' देशात जन्मली आठ अब्जवी मुलगी

चालक-वाहकासह तब्बल ३० जणांचे प्राण वाचले आहेत. तात्काळ त्याच अवस्थेत बस चालवित भिवघाट येथे आणण्यात आली. सदरच्या चालकावर त्वरीत उपचार करण्यात आले. सध्या बसचा चालक सुखरुप असून या घडलेल्या घटनेने माञ प्रवाशांची मोठी दैना उडाली होती.

वाहक वाघमारे यांच्यामुळे 30 जणांचा जीव वाचला

वाघमारे म्हणाले की, गाडी चालवत असताना अचानक चालकाला भोवळ आली. मी त्यांच्या बाजूलाच बसलो होतो. चालक थरथर कापतो आहे, हे पाहून मी लगेचच स्टेअरींग हातात घेतले. चालकाने डोक्याला हात लावला होता. त्यांनी ब्रेक लावला होता. पण गाडी उजव्या बाजूला जात होती. तितक्यात मी स्टेअरींग हातात घेऊ गाडी बाजूला घेतली. आता चालकाला रुग्णालयात दाखल केले असून ते शुद्धीवरही आलेत. त्यांची प्रकृती आता सुधारत आहे.

हे ही वाचा : याला म्हणतात नशीब! एका रात्रीत गावातील 165 लोक झाले करोडपती, नेमकं काय घडलं?

घाट चढून आल्यानंतर ड्रायव्हरचा चक्कर आल्या सारखं झाल असे बसमधील प्रवाशांनी सांगितलं. त्यानंतर इतर प्रवाशांच्या मदतीने चालकाला ड्रायव्हिंग सीटवर बाजूला बसवण्यात आले. तिथपासून रुग्णालयापर्यंत संतोष वाडमारे यांनी ही बस आणली आणि चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

First published:

Tags: Sangli, Sangli (City/Town/Village), Sangli news