मराठी बातम्या /बातम्या /Viral /

जागतिक लोकसंख्येनं गाठला आठ अब्जांचा टप्पा; 'या' देशात जन्मली आठ अब्जवी मुलगी

जागतिक लोकसंख्येनं गाठला आठ अब्जांचा टप्पा; 'या' देशात जन्मली आठ अब्जवी मुलगी

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

मुलींच्या जन्मालाही मोठ्या प्रमाणात महत्त्व दिलं जातं. अशी स्थितीत जर तुमच्या घरात जन्मलेली मुलगी जागतिक लोकसंख्येच्या दृष्टीनं अद्वितीय असेल तर? नक्कीच तुम्हाला जास्त अभिमान वाटेल.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 09 डिसेंबर : आजकाल काहीजण मुलीचा जन्म झाला की, आनंद साजरा करतात. काही ठिकाणी तर अगदी वाजतगाजत जल्लोषात मुलीच्या जन्माचं स्वागत केलं जातं. काही घरांमध्ये 'पहली बेटी धन की पेटी', असं म्हणून मुलगी झाल्याबद्दल आनंद व्यक्त होतो. एकूणच काय तर आता मुलींच्या जन्मालाही मोठ्या प्रमाणात महत्त्व दिलं जातं. अशी स्थितीत जर तुमच्या घरात जन्मलेली मुलगी जागतिक लोकसंख्येच्या दृष्टीनं अद्वितीय असेल तर? नक्कीच तुम्हाला जास्त अभिमान वाटेल.

फिलिपिन्सची राजधानी मनिलामध्ये अशाच एका अद्वितीय मुलीचा जन्म झाला आहे. ही मुलगी जगातील आठ अब्जवी व्यक्ती असल्याचं म्हटलं जातं आहे. मनिलातील विनिस मेबनसॅग (Vinice Mabansag) या मुलीच्या जन्मासह जगाची लोकसंख्या आठ अब्ज झाली आहे, असा दावा करण्यात आला आहे.

मनिलातील टोंडो येथे जन्मलेली मुलगी जगातील आठ अब्जवी व्यक्ती मानली जात आहे. टोंडो येथील डॉ. जोस फाबेला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये स्थानिक प्रमाणवेळेनुसार पहाटे 1 वाजून 29 मिनिटांनी विनिस मेबनसॅग नावाच्या मुलीचा जन्म झाला. फिलिपिन्सच्या लोकसंख्या आणि विकास आयोगाने ती जगातील आठ अब्जवी व्यक्ती म्हणून तिचं स्वागत केलं आहे.

फिलिपिन्सच्या लोकसंख्या आणि विकास आयोगानं फेसबुक पोस्ट करून मुलीचा आणि आईचा फोटोही शेअर केला आहे. या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, "टोंडोमध्ये एका लहान मुलीचा जन्म झाल्यानंतर जगानं लोकसंख्येचा आणखी एक टप्पा गाठला आहे. या मुलीला जगातील आठ अब्जवी व्यक्ती म्हणून ओळखलं जाईल.

15 नोव्हेंबर रोजी डॉ. जोस फाबेला मेमोरियल हॉस्पिटलमधील नर्सेस तसंच लोकसंख्या आणि विकास आयोगाच्या प्रतिनिधींनी बेबी विनिसचं स्वागत केलं.'

संयुक्त राष्ट्र संघटनेनंही जागतिक लोकसंख्या आठ अब्ज झाल्याबद्दल ट्विट केलं आहे. 'आठ अब्ज अपेक्षा. आठ अब्ज स्वप्नं. आठ अब्ज शक्यता. आपली पृथ्वी आता आठ अब्ज माणसांचं घर आहे,' असं ट्विट युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडनं (UNFPA) केलं आहे.

जागतिक लोकसंख्येनं आठ अब्जांचा आकडा गाठला आहे. लोकसंख्येत एक अब्ज माणसांची भर पडण्यासाठी 12 वर्षांचा कालावधी लागला. भारतामध्ये लोकसंख्येवाढीचा दर प्रचंड वाढला आहे. भारत पुढील वर्षी जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून चीनला मागे टाकण्याच्या मार्गावर आहे. गेल्या शतकात जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे.

जनजागृती केल्यानंतर लोकसंख्या वाढीचा वेग हळूहळू कमी होत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजाप्रमाणे 2037 च्या आसपास जागतिक लोकसंख्या नऊ अब्ज आणि 2058 च्या आसपास 10 अब्ज होईल.

जागतिक लोकसंख्येनं गाठलेला आठ अब्जांचा टप्पा हा सार्वजनिक आरोग्यामध्ये मोठ्या सुधारणा दर्शवतो. मृत्यूचा धोका कमी झाला आहे आणि आयुर्मान वाढलं आहे. मात्र, नागरिकांनी आता संख्येला महत्त्व देण्यापेक्षा पृथ्वी या आपल्या ग्रहाचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं विचार केला पाहिजे. पृथ्वीचं संरक्षण ही सामायिक जबाबदारी आहे, असं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Birth rate, Shocking news, Social media, Viral, Viral news