जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Sachin Tendulkar Birthday: संपूर्ण गावानं गुढी उभारून साजरा केला सचिनचा वाढदिवस, Video

Sachin Tendulkar Birthday: संपूर्ण गावानं गुढी उभारून साजरा केला सचिनचा वाढदिवस, Video

Sachin Tendulkar Birthday: संपूर्ण गावानं गुढी उभारून साजरा केला सचिनचा वाढदिवस, Video

Sachin Tendulkar 50th Birthday updates : सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसानिमित्त सांगलीत उत्साह आहे. औंढी येथे चक्क 24 एप्रिल हा दिवस गुढीपाडव्याप्रमाणे साजरा होत आहे.

  • -MIN READ Sangli,Maharashtra
  • Last Updated :

    स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 24 एप्रिल: रेडियो ट्रांजिस्टर पासून ते अगदी ट्विटरच्या जनरेशनपर्यंत ज्याला क्रिकेट खेळताना बघत अनेक पिढ्या घडल्या. त्याने आपल्या खेळीने क्रिकेट विश्वात ध्रुवताऱ्याप्रमाणे आपले अढळ स्थान प्रस्थापित केले. क्रिकेट विश्वातील जवळ जवळ सर्वच रेकॉर्ड ज्याने मोडीत काढली. मात्र क्रिकेटसह मानवी मूल्यातील क्वचितच कुठला नियम त्याने मोडू दिला. जगभरातील कुठलाही क्रिकेट चाहता जे नाव घेतल्या शिवाय पुढं जाऊच शकत नाही, असं एक नाव म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे होय. आपल्या बॅटने अनेक शतके आणि अर्धशतके फटकावणारा सचिन आज वयाचं अर्धशत साजरं करत आहे. 50 व्या जन्मदिनानिमित्त जगभरातील चाहत्यांकडून सचिनवर प्रेमाचा, शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सांगलीत जिल्ह्यातील गावात उभारली गुढी जगभरातील चाहते सचिनचा सुवर्ण महोत्सवी जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. सांगली जिल्ह्यातील एका गाावानं सचिनचा वाढदिवस मराठी नववर्षाच स्वागत केल्याप्रमाणे साजरा केला आहे. शिराळा ताालुक्यातील औंढी येथे सचिनच्या चाहत्यांनी गुढी पाडव्याप्रमाणे दारात गुढ्या उभ्या केल्या आहेत. गुढीला बॅट लावण्यात आली आहे. हार फुलांनी गुढी सजवण्यात आली आहे. तसेच सचिनचा छोटा पुतळा तयार करून त्याची गावातून मोठ्या जल्लोषात मिरवणूकही काढण्यात आली आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    पत्रकार सुनंदन लेलेंच्या उपस्थितीत मिरवणूक सचिनच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त औंढी ग्रामस्थांनी घराघरात सण साजरा केला. यामध्ये ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले हे ही सहभागी झाले. त्यांनी सचिनचा वाढदिवस जागतिक क्रिकेट दिन म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणाच करून टाकली. लेले यांच्या उपस्थितीत गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. गावातील एका टोकावरच्या हनुमान मंदिरातून प्रत्यक्ष मिरवणुकीला सुरुवात झाली. पालखीत सचिनचा अर्धपुतळा ठेवण्यात आला. गावातील महिलांचे लेझीम पथक, हलगी, तुतारी यांच्या निनादात गावातून दिंडी निघाली. रस्त्यावर जागोजागी पालखीवर फुलांची उधळण करण्यात आली. शंभर वडापावचा नैवद्य औंढीतून सचिनच्या वाढदिवसानिमित्त पालखी उत्सव झाला. रस्त्यावर पालखीचे स्वागत होते. घरोघरी महिला सचिनला दीर्घायुष्य मिळावे म्हणून औक्षण करत होत्या. पालखी सोहळ्याचा ग्रामपंचायत कार्यालयासमोर समारोप झाला. सचिनला वडापाव आवडतो म्हणून पालखी सोहळ्याच्या शेवटी पालखीला 100 वडापावचा नैवद्य दाखवण्यात आला. गावात सचिनच्या वाढदिवसानिमित्त बॅनरही लावण्यात आले आहेत. Sachin Tendulkar Birthday : सचिन तेंडुलकरनं मुख्यमंत्री व्हावं म्हणून पुणकेर मैदानात, म्हणतो…Video तेंडल्या चित्रपटाचं शूटिंग याच गावात सचिन तेंडूलकरच्या जीवनावर आधारित तेंडल्या चित्रपटाचे शूटिंग औंढी येथेच पार पडले आहे. त्यामुळे गावातील नागरिकांचे सचिनवर विशेष प्रेम आहे. त्यामुळे गुढीवर आणि गावात इतर ठिकाणीही ‘तेंडल्या’चे स्टिकर लावलेले होते. तिरंगी रंगात रंगलेल्या चिमुकल्या शाळकरी पोरांनी ‘तेंडल्या’चा जयघोष करत परिसर दणाणून सोडला. संपूर्ण गाावच या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते. गुढ्या, पताका, दिंडी, जल्लोष, घरात गोडधोड जेवण असा मोठा उत्साह सचिनच्या वाढदिवसानिमित्त गावामध्ये दिसून येत आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात