नागपूर, 31 जानेवारी : अनेक दिवस शेतात राबून मोठ्या कष्टाने पिकवलेल्या पिकांचे संगोपन करणे ही अतिशय मेहनतीचे काम आहे. या दरम्यान बऱ्याचदा अस्मानी संकटांसह नैसर्गिक आपत्ती, नागपुरात जंगली प्राण्यांचा त्रास पिकांना होतो. या प्राण्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होते. यावर उपाय म्हणून रक्षक पावर फेन्सींग हे अनोखे कुंपण विकसित करण्यात आले आहे.
मशीनमुळे प्राणी तारांच्या संपर्कात आल्यास सौम्य झटका लागून मोठ्याने आवाज होतो. परिणामी प्राण्यांना कुठलीही इजा न होता या आवाजामुळे प्राणी घाबरून कुंपणापासून दूर राहतात. विशेषता हे यंत्र सौर उर्जेवर चालते. यात कुठलीही जीवितहानी होण्याचा धोका नाही. मानव-वन्यजीव यांच्या संघर्षात शेतीच्या बचावासाठी हे कुंपण नक्कीच शेतीसाठी उपयुक्त ठरू शकणारे आहे.
प्राण्यांना धोका नाही
वाढते शहरीकरण आणि दिवसेंदिवस जंगलांचा होणारा ऱ्हास यामुळे जंगलातील प्राणी शहरांकडे अथवा शेतीत घुसून नासधूस केल्याचा घटना घडत असतात. यावर उपाय म्हणून अनेकजण वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतात. मात्र यात प्राण्यांचा मृत्यू होतो. म्हणून यात संशोधन करून रक्षक पावर फेन्सींग हे अनोखे कुंपण विकसित करण्यात आले आहे.
पल्स इतका झटका
सौम्य स्वरूपाचा धक्का या तारांच्या संपर्कात येणाऱ्या प्राण्याला लागतो. तसेच मोठ्याने सायरन वाजून प्राणी मोठ्या आवाजाला घाबरून पळून जातात. या कुंपणातील तारांमध्ये पल्स इतका झटका आहे. यामुळे या तारांच्या संपर्कात आल्यास जीव जाण्याचा धोका नसतो.
बफर झोनमध्ये सबसिडी
विशेषत: जंगल प्रभावीत क्षेत्रामध्ये ही मशीन अतिशय फायदेशीर ठरत असून बफर झोनमध्ये याला सबसिडी देखील देण्यात आली आहे. ही मशीन तीन प्रकारामध्ये विभागली आहे. त्यामध्ये पहिली प्राईम नावाने असून ही 8 केबीची आहे. ज्यात 1 ते 15 एकर शेतीचे रक्षण केल्या जाऊ शकते. तसेच यात 12 - 14 ची बॅटरी, 20 वॉटची सोलर प्लेट लावली आहे.
Blackbuck : सोलापूर जिल्ह्यातील काळविटांना कशाचा आहे सर्वाधिक धोका? पाहा Video
ऑटोमॅटिक सुरू आणि बंद
पुढचा प्रकार म्हणजे सिल्वर मशीन असून यात एक ते पंचवीस एकर शेतीचे रक्षण होऊ शकते. ही मशीन दहा केबीची असून यात 12- 30 ची बॅटरी, 20 ओल्ड ची प्लेटचा समावेश आहे. यातील तिसरी आणि महत्त्वाची म्हणजे गोल्डन मशीन होय. यात 1 ते 50 एकरपर्यंत शेतीचे रक्षण केले जाऊ शकते. यात 15 केबी आणि 12- 30 ची बॅटरी असून 40 व्हॉट प्लेट आहे. या तीनही मशीन सौर उर्जेवर चालत असून यात ऑटोमॅटिक सुरू आणि बंद होतात. तसेच आपण मॅन्युअल स्वरूपाने देखील टाईम सेट करू शकतो. अशी माहिती सुरज बोंद्रे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Local18, Nagpur