कोल्हापूर, 07 जानेवारी : सांगली जिल्ह्यातील काल(दि.07) मिरज शहरात मध्यरात्री दुकाने आणि हॉटेल जेसीबीच्या साह्याने पाडण्यात आले. या प्रकरणी गोपीचंद पडळकर यांचे बंधु ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह 100 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान याप्रकरणी तहसीलदारांनी 145 च्या नोटीसा बजवल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत. मिळकतदार जागेवर नसल्याने नोटीस घेण्यास नकार केल्याने काही काळ वातावरण तंग झाले होते.
दरम्यान यावर नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. पडळकर यांच्या दबावाखाली प्रशासन एकतर्फी कारवाई करत असल्याचा घरे पाडलेल्या लोकांनी आरोप केला आहे. मिरजेतील घरं, दुकानं पाडले जातात. प्रशासन किंवा शासनातील कोण जागेवर येत नाही, परंतु रविवारी सुट्टीचा दिवस असताना सुद्धा एकतर्फी नोटीस काढल्याचा नागरिकांनी आरोप केला. लोकांची घर पाडली असताना ती परत दुरुस्त करू नये यासाठी अशी नोटीस काढल्याचा आरोप लोकांनी केला आहे.
हे ही वाचा : 'साहेब माफ करा महापालिका टक्केवारी'..; बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाजवळील बॅनर चर्चेत
गाळे धारकांचा संताप
रातको अचानक हजारबर आदमी आये. हातमें काठ्या-दांडकी लेके धमकाने लगे. चार चार जेसीबी लगाके सब पाडणे लगे. अंदर मालबिल सब वैसाच था. प्रॉपर्टी छोडो भाई, पर घरवाले जेसीबीके निचे मर जाते तो? रातभर डरके रस्तेपे बैठे हम…बाल बाल बचें सबजणा…मातीच्या ढिगार्याखाली दबलेल्या वस्तू काढत काढत शब्बीर शेख सांगत होते. मिरज का पार बिहार हुया..असं सांगताना माती उकरणार्या गाळेधारकांच्या मनात आक्रोश आणि डोळ्यात संताप खदखदताना दिसत होता.
मिरज शहरात मध्यरात्री दोन अडीचच्या सुमाराला जेसीबी लावून दुकानं-मेडिकल- हॉटेल्स जमीनदोस्त करण्यात आली. आतील माल बाहेर काढण्याइतकाही वेळ त्यांना मिळाला नाही. आतील मालासकट दुकानं उद्ध्वस्त करण्यात आली. रात्रीच्या या हादस्यानं घाबरलेले गाळेधारक सकाळपर्यंत सावरले होते. दगडामातीचे ढिगारे उपसून वाचलेला माल टेम्पोत भरताना त्यांचा संतापाचा पारा चढत चालला होता.
गोपीचंद पडळकर म्हणाले की
याप्रकरणी गोपीचंद पडळकरांनी प्रतिक्रीयी दिली आहे ते म्हणाले की, असं काहीही झालं नाही. याच्या मुळामध्ये गेलं पाहिजे. गेल्या अनेक दिवसांपासून हा रस्ता झाला पाहिजे, अशी लोकांची मागणी होती. नितीन गडकरी साहेबांनी याला मंजुरी दिली. पण रस्त्यावर अनेक अडचणी आहे. मागील महिन्याभरापासून अतिक्रमण काढण्याचे काम सुरू आहे.
हे ही वाचा : 'वंचित'चा महाविकास आघाडीत येण्याचा मार्ग मोकळा, शरद पवारांनी दिले स्पष्ट संकेत
सांगली मिरज कुपवाड पालिकेचे आयुक्त, उपायुक्त यांनी या भागातील नागरिकांनी अतिक्रमण काढून घेण्याचे सांगितले होते. पण या लोकांनी त्यांच्याशी वादावादी केली. त्यामुळे ती लोकं निघून गेली. शेवटी महापालिकेनं मुळ मालक ब्रम्हानंद पडळकर यांच्या नावाने नोटीस काढली. 24 तासांच्या आत हे नोटीस काढा असं सांगितलं' असा दावा पडळकरांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gopichand padalkar, Sangli, Sangli (City/Town/Village), Sangli news