जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'साहेब माफ करा महापालिका टक्केवारी'..; बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाजवळील बॅनर चर्चेत

'साहेब माफ करा महापालिका टक्केवारी'..; बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाजवळील बॅनर चर्चेत

'साहेब माफ करा महापालिका टक्केवारी'..; बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाजवळील बॅनर चर्चेत

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाजवळ शिवाजी पार्कमध्ये साहेब मला माफ करा आशा अशयाचं एक भलं मोठं बॅनर लावण्यात आलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 8 जानेवारी :  बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाजवळ शिवाजी पार्कमध्ये साहेब मला माफ करा आशा अशयाचं एक भलं मोठं बॅनर एका शिवसैनिकाकडून लावण्यात आलं आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडं टक्केवारी मागितली म्हणून चाफ्याच्या झाडांचे उद्यान होऊ शकले नाही, असा आरोप या बॅनरमधून करण्यात आला आहे. शिवसैनिक राजेश चिंदरकर यांनी हा आरोप केला आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाजवळ बॅनर उभारून महापालिका अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. बॅनरमध्ये नेमकं काय म्हटलं?  या बॅनरच्या माध्यमातून अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत.  ‘साहेब आपल्या अशिर्वादाने मी राजकारणामध्ये आलो आणि आपल्या आठवणीचा व ज्ञानाचा अमृत साठा घेऊन मी एक शिवसैनिक म्हणून माझी राजकीय वाटचाल यशस्वीरित्या चालू ठेवलेली आहे. आपल्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण रेखाटलेल्या व्यंगचित्रांचे शिलालेख तसेच आपल्याला आवडणाऱ्या चाफ्यांच्या फुलांचे उद्यान निर्माण करण्यासाठी मी 2013 पासून मुंबई महापालिकेकडे पत्रव्यवहार करत होतो. शेवटी 2019 साली माझ्या प्रयत्नांना यश मिळाले आणि मला उद्यानाची परवानगी मिळाली’. हेही वाचा :  ‘जो हा अपमान सहन करत आहे ते XX ची अवलाद’, संजय राऊत संतापले, नको ते बोलून बसले ‘काम सुरू होण्यापूर्वीच टक्केवारी’   ‘परंतु जेव्हा हे काम साकारण्याचा माझ्या संस्थेनं प्रयत्न केला , तेव्हा मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कदाचीत हे काम आवडले नसावे. त्यांनी काम सुरू होण्यापूर्वीच माझ्याकडे टक्केवारीची मागणी केली. मात्र सदर काम हे अधिकृत असल्यामुळे त्यांना मी टक्केवारी देऊ शकलो नाही. त्यामुळे त्यांनी हे काम सुरू होण्याआधीच थांबवलं’ असा आरोप या बॅनरच्या माध्यमातून शिवसैनिक राजेश चिंदरकर यांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात