मुंबई, 07 फेब्रुवारी : जानेवारीच्या शेवटी कमी झालेली थंडी फेब्रुवारीच्या सुरूवातीला पुन्हा जाणवू लागली होती. दरम्यान राज्यातून थंडी पुन्हा गायब होण्याची शक्यता आहे. सकाळच्या दरम्यान काही अंशी थंडी जाणवत आहे परंतु किमान तापमानात वाढ होत आहे. परंतु उत्तर महाराष्ट्रासह, मराठवाड्यात थंडीचा जोर कायम असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. आज (ता. 07) राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान मागच्या 24 तासांत धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी 9 अंश, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात 9.3 तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात 9.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
हे ही वाचा : Beed: ऊसतोड कामगारांच्या बीड जिल्ह्यातच शेतकरी अडचणीत, 3 महिने उलटले तरी...
याचबरोबर राज्याच्या काही भागात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा 11 अंशांच्या वर गेला आहे. कमाल तापमानातही वाढ होत असून, अनेक ठिकाणी पारा 31 अंशांच्या वर असून, उकाड्यात वाढ होत आहे. रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी 36.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
उत्तर भारतात पुढील 24 तासांत नव्याने चक्रावात जाणवण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील राज्यात थंडी कमी झाली आहे. सोमवारी (ता.06) मध्य प्रदेशातील मालाजखंड येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी 7.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
आज (ता.07) उत्तर पश्चिम बंगाल आणि सिक्कीम राज्यात तुरळक ठिकाणी दाट धुके पडण्याची शक्यता आहे. तर अरुणाचल प्रदेश, आसाम, - मेघालयसह ईशान्य भारतातील राज्यात विजा, गारपिटीसह पावसाची शक्यता आहे.
हे ही वाचा : सांगलीच्या गुलाबाचा देशात डंका! 2 एकरातून करतोय लाखोंची कमाई, पाहा PHOTO
पुणे 33. 1 (11.5), जळगाव 33.6 (10.3), धुळे 31.0 (9.0), कोल्हापूर 32.4 (18.3), महाबळेश्वर 29.1 (15.0), नाशिक 31. 8 (12.5), सांगली 33.1 (16.9), सातारा 32.7 (14.0), सोलापूर 34.8 (16.7), रत्नागिरी 36.1 (18.5), औरंगाबाद 31.6 (10.4), अकोला 34.0 (13.0), अमरावती 32.8 (12.5), बुलडाणा 31.0 (15.0), गोंदिया 32.0 (12.2), नागपूर 32.0 (11.3), वर्धा 32.5 (12 .2), वाशिम - (14.4), यवतमाळ 32.5 (14.5).
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weather, Weather Forecast, Weather Update, Winter, Winter session