जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Sangli : अमेरिकेतील शिक्षण सोडून सरपंचपदाच्या निवडणुकीत उतरली तरूणी, Video

Sangli : अमेरिकेतील शिक्षण सोडून सरपंचपदाच्या निवडणुकीत उतरली तरूणी, Video

Sangli : अमेरिकेतील शिक्षण सोडून सरपंचपदाच्या निवडणुकीत उतरली तरूणी, Video

अमेरिकेत वैद्यकीय शिक्षण घेतलेली तरुणी थेट ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात उतरली असून सरपंचपदासाठी निवडणूक लढवत आहे.

  • -MIN READ Sangli,Maharashtra
  • Last Updated :

सांगली, 15 डिसेंबर : तरुणीने डॉक्टर होऊन रुग्णसेवा करण्याचे स्वप्न अर्ध्यात सोडून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. यशोधरा महेंद्रसिंग शिंदे असे या तरुणीचे नाव असून ती जॉर्जिया येथे वैद्यकीय शिक्षण घेत होती. गावकऱ्यांच्या मदतीसाठी तिने करिअरचा विचार न करता गावाच्या विकासाला प्राधान्य दिले. गावाचा नावलौकिक वाढविण्यासाठी यशोधरा ग्रामपंचायत निवडणुकीत आपले नशीब अजमावत आहे.   जॉर्जिया येथे वैद्यकीय शिक्षण घेतलेली तरुणी थेट ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहे. उच्च शिक्षित फॉरेन रीटर्न असणारी यशोधरा महेंद्रसिंग शिंदे ही सांगली जिल्ह्यातील वड्डी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाची उमेदवार झाली आहे. या फॉरेन रीटर्न उमेदवाराची पंचक्रोशीत चर्चा आहे. ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे खऱ्या खऱ्या लोकशाहीची परीक्षाच असते. या निवडणुकीची चुरस लोकसभा विधानसभा निवडणुकींनाही मागे टाकणारी असते. अर्थात या निवडणुका जरी पक्षाच्या चिन्हांवर लढवल्या जात नसल्या तरी आपापल्या पक्षाच्या स्थानिक, दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना चार्ज रिचार्ज करणाऱ्या असतात. कोणकोणती, किती गावे, कुठल्या पक्षाची आणि गटातील आहे , त्याची त्या त्या गावातील वट किती, हे या निवडणुकीवरच तर ठरते. अख्ख गाव करतंय गाजराची शेती, कमी कालावधीमध्ये लाखोंचं उत्पन्न Video अनेक ठिकाणी निवडणुका अटीतटीच्या आणि संघर्षपूर्ण सुद्धा बघायला मिळत असतात. मात्र ग्रामपंचायत राजकारणाचे चित्र जरासे बदलताना दिसून येत आहे. थोडेसे सकारात्मक राजकारणाचा विचार पुढे येत आहे. सध्या राजकारणात तरुणांच्या कल मोठ्या प्रमाणात दिसत आहे.  

विदेशातील पॅटर्न राबविणार सांगली जिल्ह्यातील सुमारे पाच हजार लोकवस्तीचं वड्डी हे मिरज शहरालगत असणारे गाव आहे. या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत विकासाचा मुद्दा उपस्थित करत जॉर्जिया येथे वैद्यकीय शिक्षण घेतलेली तरुणी यशोधरा महेंद्रसिंग शिंदे ही निवडणुकीत सरपंच पदाची उमेदवार झाली आहे. गावकऱ्यांना शुद्ध पिण्याच पाणी, शिक्षण, आरोग्य, आणि नागरी सुविधा हा अजेंडा घेऊन ती गावात प्रचार करत आहे. विदेशातील गावांप्रमाणे आपल्या गावचा विकास करण्याचा मानस यशोधराचा आहे. पिकांवर आलंय नवीन भयंकर संकट, रात्रीत होतोय हल्ला Video गावाचा विकास करणार गावातील महिलांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्नाबाबत तिला काम करण्याची इच्छा आहे. गावासाठी सगळी विकासाची कामे करण्यात किंवा सरकारकडून करून घेण्यात आपले लोकप्रतिनिधी कमी पडतात. मात्र, आपण निवडून आल्यावर गावाला सर्व सुविधा मिळवू देण्याचा प्रयत्न करणार असल्याच यसोधरा सांगते.  

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18 , sangli
  • First Published :
जाहिरात
जाहिरात