सांगली, 15 डिसेंबर : कवलापूर गावातील शेतकऱ्यांनी वाडवडिलांपासून गाजराची शेती कायम ठेवली आहे. कमी कालावधीत चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी गाजराच्या शेतीला पसंती देतात. गावातील जवळपास सर्वच शेतकरी गाजराची शेती करीत असल्यानं या गावाला गाजराचं गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. कशी होते येथील गाजराची शेती, पाहुयात. जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कवलापूर या गावात गाजर शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. छोट्याशा कवलापूर गावातून शेकडो एकर शेतीवर केवळ गाजराचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे गाजरांचं गाव म्हणून कवलापुरची ओळख निर्माण झाली आहे. मिरज तालुक्यातील कवलापूर हे गाव सांगली शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे. या गावातील प्रत्येक कुटुंब सधन आहे. पिकांवर आलंय नवीन भयंकर संकट, रात्रीत होतोय हल्ला Video गावाला मुबलक पाणी असल्यामुळे कवलापूर परिसरात भाजीपाल्याच्या शेतीसह ऊस, द्राक्ष आणि गाजराचे उत्पादन घेतले जाते. मात्र, प्रामुख्याने उसाच्या शेतीबरोबर या ठिकाणी गाजराची शेती मोठ्या प्रमाणात होते. इथे पिकणाऱ्या गाजरांना एक विशिष्ट चव आहे या चवीमुळं येथील गाजरांना महाराष्ट्रासह, कर्नाटकमध्येही मोठी मागणी आहे. कमी कालावधीत जास्त नफा या गावातील सुमारे साडेचारशे एकर क्षेत्रात गाजराचे उत्पादन वर्षाला घेतली जाते. म्हणून या गावातील शेतकरी गाजर शेतीला प्रथम पसंती देतात. गाजराचा कालावधी तीन महिन्याचा असतो. बाजारपेठेत या गाजरांना 20 ते 22 रुपये इतका दर मिळतो.या गाजराचे उत्पादन घेण्यासाठी एकरी 30 ते 40 हजार रुपये इतका येतो. तर यामधून एकरी 80 ते 90 हजार रुपयांचा फायदा होतो. Video: पत्रकार तरुणानं सुरू केली कोल्हापुरातील पहिली हुरडा पार्टी, Inside Story राज्याबाहेर विक्री कमी कालावधीत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा गाजर शेतीतून मिळतो. येथील गाजराचे वैशिष्ट्य म्हणजे चवीला गोड आणि शरीराला पौष्टिक असून देशी म्हणून या गाजराची निवड केली जाते. या गाजराला सांगली, कोल्हापूर, कराड, सातारा, तसेच कर्नाटकातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पण पुण्याच्या बाजारपेठेत मागणी कमी असल्याने या गाजरांना परराज्यात नेऊन विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली असल्याचे शेतकरी सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.