मुंबई, 6 सप्टेंबर : नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) चे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (MD आणि CEO) रवी नारायण यांना कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. ईडीने को-लोकेशन प्रकरणात नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (NSE) चे माजी अध्यक्ष रवी नारायण यांना अटक केली आहे. अमंलबजावणी संचालनालयाने या वर्षी 14 जुलै रोजी NSE चे माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंसह रवी नारायण यांच्याविरोधात प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
Ravi Narain, former chairman of the National Stock Exchange of India (NSE) arrested, in the Co-location case: Enforcement Directorate
— ANI (@ANI) September 6, 2022
यापूर्वी सेंट्रल ब्युरो ऑफ इनवेस्टिगेशननेही 2009 आणि 2017 दरम्यान NSE कर्मचाऱ्यांची कथितरित्या फोन टॅप करण्याच्या आरोपात तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. विशेष म्हणजे NSE को-लोकेशन प्रकरणात सीबीआयदेखील तपास करीत आहे. बातमी अपडेट होत आहे.