मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सुशांतसिंह राजपूतप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुखांनी CBI ला केला 'हा' सवाल

सुशांतसिंह राजपूतप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुखांनी CBI ला केला 'हा' सवाल

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली?

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली?

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली?

  • Published by:  Sandip Parolekar

नागपूर, 27 डिसेंबर: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Bollywood Actor sushant singh rajput Suicide case) याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, याबाबतचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) करत आहे. पाच-सहा महिने झाले, काय शोध लागला? अशा सवाल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra Home Minister Anil Deshmukh) यांनी केला आहे. सीबीआयने याबाबत लवकरात लवकर खुलासा करावा, अशी मागणी देखील गृहमंत्र्यांनी केली आहे.

हेही वाचा...पार्थ पवार पंढरपुरातून आमदरकीची निवडणूक लढवणार का? रोहित पवार म्हणाले...

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपुरात पत्रकाराशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, सुशांतसिंह प्रकरणी तपास करणाऱ्या सीबीआयच्या चौकशीवर गृहमंत्र्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. सीबीआयने चौकशी हातात घेऊन आता 5-6 महिने उलटले आहेत. मात्र, अद्याप सीबीआयनं काहीही खुलासा केलेला नाही. सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, याबाबत सीबीआयनं लवकर खुलासा करावा असं गृहमंत्र्यांनी सांगितलं.

सुशांत सिंह राजपूत याने 14 जून रोजी मुंबईतील फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतच्या मृत्यूनं संपूर्ण देश हादरला होता. सुशांतसिंहच्या मृत्यूनंतर मात्र अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. सुशांतची आत्महत्या नसून त्याची हत्या झाल्याचा संशय त्यांच्या वडिलांनी व्यक्त केला होता.

नागपूरचा क्राईम 15 टक्क्यांनी कमी

नागपूर शहरात गुन्हेगारीत 15 टक्क्यांनी घट झाल्याचा दावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. काही इलेक्ट्रानिक मीडियांनी क्राईमच्या चुकीच्या बातम्या दाखवल्या. गुन्हेगारीवर कसं नियंत्रण आणता येईल, यावर पोलीस उत्तम काम करत आहेत. ड्रग्सविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोलिंगसाठी 200 बॉडी कॅमेरे आणणार आहे. पोलीस स्टेशनमध्ये पडलेल्या टू व्हीलर आणि फोर व्हीलरचा निकाल लवकर लावणार असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं.

First published: