मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

या भितीपोटी लग्न करत नाही सलमान, कारण ऐकून तुम्ही कराल कौतुक!

या भितीपोटी लग्न करत नाही सलमान, कारण ऐकून तुम्ही कराल कौतुक!

सलमान खानच्या लोकप्रियतेने त्याला सुपरस्टार पदावर पोचवले आहे. मात्र हा सुपरस्टार आजही सिंगल का आहे हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडत असतो.

सलमान खानच्या लोकप्रियतेने त्याला सुपरस्टार पदावर पोचवले आहे. मात्र हा सुपरस्टार आजही सिंगल का आहे हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडत असतो.

सलमान खानच्या लोकप्रियतेने त्याला सुपरस्टार पदावर पोचवले आहे. मात्र हा सुपरस्टार आजही सिंगल का आहे हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडत असतो.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 27 डिसेंबर : दबंग भाई सलमान खानचा (Salman Khan) आज वाढदिवस. भाई आज 55 वर्षांचा झाला. आजही कित्येक तरुणींच्या दिल की धडकन असलेला सलमान सिंगल (single) आहे. त्याचे चाहते, सहकलाकार त्याला सतत विचारत असतात की लग्न (marriage) कधी करणार? तो दरवेळी हजरजबाबीपणे काहीतरी उत्तर देऊन मूळ प्रश्नाला बगल देतो. मात्र तो नेमका लग्न कधी करणार? करणार की नाही याचा कधीच अंदाज त्यातून लागत नाही. या सुपस्टारच्या (superstar) अविवाहित राहण्याबाबत आजवर बरेच अंदाज लावले गेलेत. मात्र दरम्यानच्या काळात सलमानच्या लग्नाबाबत त्याच्या स्वतःच्या धारणेशी जोडलेली एक गोष्ट समोर आली आहे. या गोष्टीची कुणी कधी कल्पनाही केली नसेल. शिवाय ती गोष्ट इतकी कॉमन आहे, की कुणीही तिच्याशी रिलेट करू शकेल. 'नवभारत टाइम्स'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. या गोष्टीची वाटते भिती सलमानला लग्नाशी जोडलेल्या एका अशा गोष्टीची भिती वाटते, ज्यामुळे तो कमिटमेंट करू शकत नाही. ही गोष्ट म्हणजे सलमान आपल्या कुटुंबावर करत असलेलं प्रेम. सलमानच्या मते, तो त्याच्या कुटुंबावर खूप प्रेम करतो आणि कुटुंबातल्या सदस्यांसाठी अगदी काहीही करायला तयार असतो. सलमानला या गोष्टीची भिती वाटते, की लग्न केल्यावरही तो आपल्या कुटुंबाबतचा मोह आणि अटॅचमेंट कमी करू शकणार नाही. आपल्या पत्नीला तो कुटुंबाला वेळ देत असताना पुरेसं अटेन्शन आणि केअर देऊ शकणार नाही. तिचा या दोन्ही गोष्टींवर हक्क असणार आहे. आणि असं करणं अतिशय चुकीचं असेल. कुटुंबाची काळजी सलमान खान अशी एकटी व्यक्ती नाही जो आपल्या रिलेशनशिपमध्ये यामुळे कमिटमेंट करू शकत नाही कारण तिला आपल्या कुटुंबाशी जोडलेल्या गोष्टी आणि भावना यांबाबत ताण आहे. या जगात प्रत्येकालाच असा जोडीदार पाहिजे, जो प्रत्येकवेळी साथ निभावेल आणि सोबतच त्याच्या किंवा तिच्या कुटुंबाला प्रेम आणि आदर देईल. ही गोष्ट केवळ मुलांबाबतच नाही तर मुलींबाबतही लागू होते. कारण तिलाही असाच जोडीदार पाहिजे असतो जो तिच्या पालकांना तसाच आदर देईल शिवाय त्यांची काळजीही घेईल. असा जोडीदार मिळत नसेल, तर अनेकजण लग्नाचा निर्णय घेताना बिचकतात हे वास्तव आहे.
First published:

Tags: Marriage, Salman khan

पुढील बातम्या