सांगली, 20 सप्टेंबर : सांगली जिल्ह्यातील कडेगावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरात कोणी नसल्याचा अंदाज घेत अल्पवयीन मुुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. (Sangli Rape Case) याप्रकरणी संशयित सचिन सुरेश पवार (रा. निमसोड, ता. कडेगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अल्पवयीन पीडितेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सांगली जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलिस प्रशासनाच्या कार्यवाहीवर बोट दाखवले जात आहे.
याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित ही अल्पवयीन असल्याचे माहीत असताना संशयित सचिन एप्रिल 2022 च्या पहिल्या आठवड्यात पीडितेचे आई-वडील बाहेर गेले असताना दुपारी घरी गेला. पीडित एकटीच घरी असल्याचे पाहून संशयित सचिन याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर हा प्रकार कोणास सांगितला तर तुला व तुझ्या आई व वडिलांनी जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली.
हे ही वाचा : कुत्रा भुंकत असल्याने भडकला व्यक्ती; रागात पाठलाग करत क्रूरतेचा कळस गाठला
त्यांनतर जुलै 2022 मध्ये एके दिवशी पीडित मुलगी कराड येथे कॉलेजला एस.टी. बसने जात असताना बसचा पाठलाग केला. कराड- सैदापूर कॅनॉलजवळ बसमधून पीडित खाली उतरल्यानंतर संशयिताने तिला फोन का उचलत नाही, असे म्हणून आरडा ओरडा करीत शिवीगाळ केली. याबाबत अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक पवार करीत आहेत. याबाबत पीडितेने कडेगाव पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी संशयित सचिन पवार याला अटक केली.
सांगलीत दोन भयानक घटना
सांगलीच्या इस्लामपूर येथील कोळी मळा परिसरातील विवाहिता राजनंदिनी सरनोबत यांचा काल विहिरीत पाय घसरून व पाण्यात बुडून मृत्यू झाला होता, अशी माहिती समोर आली होती. मात्र, या विवाहितेचा मृत्यू अपघाती नसून त्यांची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. दोन मुली झाल्याच्या रागातून पतीनेच विहिरीत ढकलून पत्नीला विहिरीत ढकलून दिले. सदर माहिती समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा : मुंबई -अहमदाबाद महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; डिव्हायडर तोडून टेम्पोवर धडकली कार, तिघांचा जागीच मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, राजनंदिनी कौस्तुभ सरनोबत असे मृत महिलेचे नाव आहे. रात्री उशिरा राजनंदिनी हिचा पती कौस्तुभ कृष्णराव सरनोबत याच्याविरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राजनंदिनी यांच्या माहेरचे नातेवाईक मिलिंद नानासाहेब सावंत यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती कौस्तुभ कृष्णराव सरनोबत याला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.