नवी दिल्ली 20 सप्टेंबर : अलीकडेच दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक भागात कुत्र्यांच्या हल्ल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. यामध्ये पाळीव कुत्र्यांपासून ते रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचाही समावेश आहे. यानंतर कुत्र्यांबद्दलचा लोकांचा दृष्टीकोन थोडा बदलत आहे. लोक त्यांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाय करत आहेत. अशातच बंगळुरूमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. दोड्डाबल्लापुरा येथील मेदागोंडानहल्ली येथे एका व्यक्तीने कुत्र्याला एअरगनने मारलं. ही घटना शनिवारी संध्याकाळची असल्याचं सांगण्यात येत आहे. कृष्णप्पा (45) असं आरोपीचं नाव आहे. शिर्डीतील शिक्षकाचं शाळकरी मुलींसोबत गैरकृत्य, प्रकार उघडकीस येताच पालकांनी दिला चोप कुत्र्याच्या भुंकण्याचा राग आल्याने कृष्णप्पाने त्याला गोळ्या झाडल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णप्पाने कुत्र्यावर अनेक वेळा गोळ्या झाडल्या कारण तो कुत्रा त्याच्यावर भुंकत होता. सुरुवातीच्या गोळीबारानंतर कुत्रा पळून गेला. मात्र कृष्णप्पाने त्याचा पाठलाग करत पुन्हा एका शेतात त्याच्यावर गोळीबार केला. यावेळी आरोपीनी कुत्र्यावर अनेक राऊंड गोळीबार केला. एजन्सीच्या माहितीनुसार, कुत्र्याची काळजी घेत असलेल्या स्थानिक व्यक्ती हरीशने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे पोलिसांनी आरोपीविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि आयपीसी कलम ४२९ (गुरे मारणे किंवा अपंग करणे इ.) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. आरोपीवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं. सावधान! तुम्हालाही कारमध्ये मौल्यवान वस्तू ठेवण्याची सवय? पुण्यातून समोर आली धक्कादायक घटना नुकतंच केरळमधील कासारगोडचं एक प्रकरण समोर आलं होतं, ज्यामध्ये एक वडील एअर गन घेऊन मुलांना शाळेत पोहोचवण्यासाठी निघाले होते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. भटक्या कुत्र्यांच्या भीतीने हातात एअर गन घेऊन मुलांना शाळेत नेण्यासाठी बाहेर पडलेल्या व्यक्तीचं नाव समीर होतं. राज्यभरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या वाढत्या घटनांदरम्यान समीरचा हा व्हिडिओ सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.