बीड, 21 ऑगस्ट : नांदेडमध्ये (nanded) मराठा आरक्षणासाठी ( maratha reservation) खासदार संभाजीराजे (sambhajiraje) यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. पण, कोविडच्या (covid 19) काळात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अनेक मराठा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे, गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा’ असं म्हणत छत्रपती संभाजीराजेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नांदेडमध्ये मराठा मूक आंदोलन प्रकरणी 21 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोविड काळात गर्दी जमवून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि कोविड नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी आयोजकांवर वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा !
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 21, 2021
सामान्य गरीब मराठा बांधवांच्यावर का ?
समाजाच्या प्रश्नांसाठी नांदेड येथे एकत्र आलेल्या मराठा बांधवांवर प्रशासनाने कोविडचे कारण दाखवत गुन्हे दाखल केले आहेत.
राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळा न्याय, असे का ? pic.twitter.com/y7uuqtA8Vq
कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे संभाजीराजे कमालीचे संतापले आहे. जर तुम्हाला गुन्हे दाखल करायचे असेल तर माझ्यावर करा, सामान्य गरिब मराठा बांधवांच्यावर का? असा सवाल संभाजीराजेंनी उपस्थितीत केला. समाजाच्या प्रश्नांसाठी नांदेड येथे एकत्र आलेल्या मराठा बांधवांवर प्रशासनाने कोविडचे कारण दाखवत गुन्हे दाखल केले आहेत. राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळा न्याय असे का? असा सवालही संभाजीराजे यांनी उपस्थितीत केला. गंगा नदीच्या पुरातून वाचवताना महिलेची Delivery,गोंडस मुलीला दिलं नदीचं नावं दरम्यान, नांदेड मराठा क्रांती मुक आंदोलकांच्या पाठीशी छत्रपती संभाजीराजे ठाम उभे आहेत. शुक्रवारी मराठा क्रांती मूक आंदोलन नांदेड येथे छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडले. यावेळी मराठा समाजाने खदखद दाखविण्यासाठी हजारोंच्या संख्येची एकी दाखवली. आरक्षणासह इतर प्रश्न सोडविण्यासाठी मराठा बांधव छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात आक्रमक होताना दिसत आहेत. Oh No! स्टंट करता करता धाडकन तोंडावर आपटला अन्…; VIDEO पाहून पोट धरून हसाल एकीकडे सर्व राजकीय पक्षांचे सभा, मेळावे, आंदोलन होत असताना मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांवर गुन्हा दाखल झाल्याने संभाजीराजे यांनी Tweet च्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे.