मराठी बातम्या /बातम्या /देश /

पुरात अडकलेल्या महिलेला प्रसूती वेदना, गंगा नदी ओलांडताना दिला गोंडस मुलीला जन्म

पुरात अडकलेल्या महिलेला प्रसूती वेदना, गंगा नदी ओलांडताना दिला गोंडस मुलीला जन्म

बुधनी देवीला अचानक प्रसूती वेदना (labour pain) सुरू झाल्यानंतर एनडीआरएफने जलदूत बनून मदत केली.

बुधनी देवीला अचानक प्रसूती वेदना (labour pain) सुरू झाल्यानंतर एनडीआरएफने जलदूत बनून मदत केली.

बुधनी देवीला अचानक प्रसूती वेदना (labour pain) सुरू झाल्यानंतर एनडीआरएफने जलदूत बनून मदत केली.

पाटणा, 21 ऑगस्ट: बिहारच्या (Bihar Flood) अनेक भागांमध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. कटिहारमधील पूरग्रस्तांसाठी (Katihar floods) एनडीआरएफचे (NDRF) जवान देवदूताची भूमिका निभावत आहेत. कटिहार कुर्सेला ब्लॉकमधील शेरमारी गाव गंगेच्या पुरामुळे पूर्णपणे प्रभावित झाले आहे. पुरामुळे या गावाचा ब्लॉक मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. अशा परिस्थितीत शेरमारी गावातील रहिवासी असलेल्या बुधनी देवीला अचानक प्रसूती वेदना (labour pain) सुरू झाल्यानंतर एनडीआरएफने जलदूत बनून मदत केली. जवानांच्या मदतीने या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म (Girl born during floods) दिला. या मदतीमुळे एनडीआरएफ टीमचे सर्वत्र (Bihar floods NDRF rescue) कौतुक केले जात आहे. गावातील बुधनी देवी नावाच्या महिलेला प्रसूती वेदना (Woman delivered baby during flood) होत असल्याची माहिती NDRF टीमला मिळाली होती. या माहितीच्या आधारे जवान गावात पोहोचले आणि त्यांनी बुधनी देवीला पुराचे पाणी पार करून आरोग्य केंद्रात (NDRF team rescued pregnant woman) नेले. तिथे बुधनी देवीने एका निरोगी बाळाला जन्म दिला. सध्या आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती एकदम ठीक आहे. या मुलीचा जन्म गंगा नदीच्या (Girl born during flood) पुरामध्ये झाला. त्यामुळे गंगा नदीचंच नाव (Born during floods girl named Ganga) या मुलीला देण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे मुलीची आजी उषादेवी यांनी सांगितले.

पुलवामातल्या त्रालमध्ये भारतीय जवान-दहशतवाद्यांमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवाद्यांचा खात्मा

 एनडीआरएफ करत आहे मदत
NDRF चे जवान आमच्यासाठी देवदूत म्हणून समोर आले. त्यांच्या सहकार्यासाठी आम्ही सर्व त्यांचे ऋणी आहोत, अशी भावना उषादेवी यांनी व्यक्त केली. सध्या आई आणि मूल दोघेही निरोगी आहेत, अशी माहिती आरोग्य कर्मचारी संगीता यांनी दिली. कुर्सेलाच्या बीडीओंनी बुधनी देवीबद्दल माहिती कळवली होती. त्यानुसार आम्ही गावात गेल्याचे एनडीआरएफ अधिकारी अनिल कुमार यांनी सांगितले. दरम्यान, बिहारमधील महानंदा, कोसी आणि खिरोई नद्या वगळता इतर नद्यांचा पूर आता ओसरतो (Bihar flood update) आहे. गंगा नदीच्या पाण्याचा स्तरही बऱ्याच ठिकाणी उतरला आहे. पाटण्यातील दीघा घाट, गांधी घाट याठिकाणी गंगेच्या पाण्याचा स्तर कमी झाला आहे. तर, मुंगेरमध्येही पुढील 24 तासांमध्ये पाण्याची पातळी कमी होण्याची शक्यता आहे.
First published:

Tags: Bihar, Pregnant woman

पुढील बातम्या