Home /News /sport /

2 वर्षाच्या मुलाची सानिया मिर्झाला काळजी, क्रीडा मंत्रालयानं मागितली ब्रिटनची मदत

2 वर्षाच्या मुलाची सानिया मिर्झाला काळजी, क्रीडा मंत्रालयानं मागितली ब्रिटनची मदत

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) टोक्यो ऑलिम्पिक (Tokyo Olympics 2021) पूर्वी ब्रिटनमध्ये अनेक टेनिस स्पर्धा खेळणार आहे. कोरोनामुळे बदललेल्या परिस्थितीचा तिला देखील फटका बसला आहे.

    मुंबई, 20 मे: भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) टोक्यो ऑलिम्पिक (Tokyo Olympics 2021) पूर्वी ब्रिटनमध्ये अनेक टेनिस स्पर्धा खेळणार आहे. कोरोनामुळे बदललेल्या परिस्थितीचा तिला देखील फटका बसला आहे. या परिस्थितीमध्ये ब्रिटनमध्ये दोन वर्षाच्या मुलाला घेऊन जाण्यासाठी सानियासमोर अडचण निर्माण झाली आहे. सानियानं याबाबत क्रीडा मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. त्यानंतर क्रीडा मंत्रालयानं सानियाच्या मुलाला व्हिसा द्यावा यासाठी ब्रिटन सरकारकडे विनंती केली आहे. क्रीडा मंत्रालयानं याबाबत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हंटलं आहे की, "सानिया मिर्झाचा टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजना (TOPS) मध्ये समावेश आहे. तिनं मुलाच्या व्हिसासाठी मदत करण्याची मंत्रालयाकडं मागणी केली आहे. दोन वर्षाच्या मुलाला एकटं सोडून ब्रिटनमध्ये महिनाभर जाणे शक्य नाही, असे सानियाने कळवले आहे." सानिया 14 जूनपासून बर्मिंगहॅम ओपन, 20 जूनपासून इस्टबर्न ओपन आणि 28 जूनपासून विम्बलडन स्पर्धेत सहभागी होणार आहे. सानिया मिर्झानं केलेल्या विनंतीनंतर क्रीडा मंत्रालय लगेच कामाला लागले आहे. मंत्रालयानं ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्ताला याबाबत मदत करण्याची सूचना केली आहे. या प्रकरणात क्रेंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी सांगितले की, "मी सानियाची विनंती मान्य केली आहे. क्रीडा मंत्रालयाचे अधिकारी परररष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात आहेत. ब्रिटन सरकार सानियाला मुलासह प्रवास करण्याची परवानगी देईल, अशी आम्हाला आशा आहे." मोठा फरक! भारतीय महिला टीमचा संपूर्ण पगार एकट्या विराट कोहलीपेक्षा कमी महिनाभर खोलीत होती बंद सानिया मिर्झानं काही दिवसांपूर्वीच तिला आलेल्या डिप्रेशनचा खुलासा केला होता. बीजिंगमध्ये 2008 साली झालेल्या ऑलिम्पिकमधून सानियाला दुखापतीमुळे माघार घेतली होती. त्यानंतर ती 3-4 महिने डिप्रेशनमध्ये होती. मी जवळपास एक महिना खोलीमध्ये बंद होते. आपण टेनिस पुन्हा खेळू असं मला वाटत नव्हतं. कोणत्याही गोष्टीमुळे मी रडत असे'' असं सानियानं सांगितलं. अर्थात जिद्दी सानियानं या नैराश्यावर मात करत दमदार पुनरागमन केले आणि अनेक स्पर्धात देशाला अभिमान वाटावी अशी कामगिरी केली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Britain, Sania mirza, Tennis player

    पुढील बातम्या