कल्याण, 24 जुलै: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या रथ यात्रेतील रथाचा सारथी असलेले सलीम मखानी यांचं निधन झालं. सलीम मखानी यांच्या फुप्फुसांना इन्फेक्शन झालं होतं. त्यांचा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आला होता. भायखळा येथील मदिना रुग्णालयात सलीम मखानी यांच्यावर 4 जुलैपासून उपचार सुरू होते. मात्र, यादरम्यान सलीम मखानी यांची प्राणज्योत मालवली. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तातडीनं सलीम मखानी यांच्यासाठी दोन महागडी इंजेक्शन्स (40 हजार रुपये किमती एक) पाठवली होती.
हेही वाचा... बकरी ईद! प्रतिकात्मक कुर्बानी इस्लाम विरोधी, काँग्रेस नेत्याचा सरकारला विरोध
सलीम मखानी हे लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेत सहभागी झाले होते. एवढं नाही तर ते रथाचे सारथी होते. सलीम मखानी यांचे सर्व राजकीय मंडळींशी जवळचे संबंध होते. सलीम यांच्या निधनाने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात केडीएमसी कॉन्ट्रॅक्टर अससोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सलीम मखानी हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे एक जिवंत उदाहरण होतं.
डोंबिवली शास्त्री नगर रुग्णालयात सलीम मखानी यांना शुक्रवारी (4 जुलै) दाखल करण्यात आलं होतं. मात्र, रुग्णालयत बेड उपलब्ध नसल्यानं त्यांना काही काळ खोळंबून रहावं लागलं. अनेक प्रयत्न करुनही त्यांना बेड मिळाला नाही. धक्कादायक म्हणजे सलीनभाई यांना शास्त्री नगर रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर हातात धरून खुर्चीवर बसून रहावं लागलं होतं.
हेही वाचा..लक्षात असूद्या! मुंबईकरांनो, तुमच्या इमारतीमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळला तर...
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना याबाबत माहिती मिळाली. वेळेचं गांभीर्य ओळखून घेऊन त्यांनी तातडीने बेड मिळवून दिला. एवढंच नाही तर या शिवाय दोन महागडी इंजेक्शन्स पाठवून दिली. तसंच अजून लागली तर सांगा असंही सांगितलं.
नंतर सलीम भाई यांना भायखळा येथील मदिना रुग्णालयात हल वण्यात आलं होतं.