जगाला बनावट कोरोना लशीचा धोका; तज्ज्ञांनी दिला सावधानतेचा इशारा

जगाला बनावट कोरोना लशीचा धोका; तज्ज्ञांनी दिला सावधानतेचा इशारा

कोरोना लस (Corona Vaccine) घेताना ती योग्य आहे की बनावट यामध्ये ग्राहकांनीही जागृक असणं गरजेचं आहे.

  • Share this:

मुंबई, 15 नोव्हेंबर: कोरोना व्हायरस (Corona Virus)मुळे सारं जग त्रस्त आहे. जगातील मोठ-मोठे देश गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनावर लस निर्माण करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. काही देश कोरोना लस (Corona Vaccine) मिळाल्याचा दावा करत आहेत. पण अद्याप लशीच्या तपासण्या सुरू आहेत. एकदा कोरोना लस बाजारात आली की, काही कंपन्या कोरोनाची बनावट लस बनवून लोकांना लुबाडू शकतात. असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

ब्रिटनच्या नॅशनल क्राइम एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी जगातील सर्व नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. independent.co.uk च्या रिपोर्टनुसार, ब्रिटनच्या नॅशनल क्राइम एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी बनावट लस बनवणाऱ्या कंपन्यांचा तपास करायलादेखील सुरूवात केली आहे. ज्याप्रमाणे कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात बनावट पीपीई कीट, सॅनिटायझरचा व्यवासय सुरू झाला होता तसंच वापरलेले मास्क, हँड ग्लोव्ह्ज पुन्हा विकण्याचे प्रकार उघडकीस आले होते, त्याप्रमाणे कोरोनाची बनावट लसही येण्याची शक्यता आहे.

ब्रिटनच्या नॅशनल क्राइम एजन्सीमधील इकोनॉमिक क्राइम सेंटरच्या डायरेक्टर जनरल ग्रॅम बिगर यांचा दावा आहे की, ‘बनावट कोरोना लशीचं मोठं रॅकेट जगभरात पसरण्याची शक्यता आहे. कोरोनावर जशी लस तयार होईल तसा बोगस लस बनवणाऱ्यांचा धंदाही तेजीत येईल.’ अशा ठगांना रोखण्यासाठी आपण आधीपासूनच तयारी केली पाहिजे. एका ब्रिटीश अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, ‘कोरोनावर ज्या कंपन्या लस शोधत आहेत त्यांना सायबर हल्ल्यांना सामोरं जावं लागलं आहे. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये असे प्रकार घडले आहेत.’ त्यामुळे कोरोना लस बाजारात येईल तेव्हा थोडे कमी पैसे देऊन बनावट लस घेण्यापेक्षा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसराच घेणं फायदेशीर ठरणार आहे. कोरोना लस घेताना ती योग्य आहे की बनावट यामध्ये ग्राहकांनीही जागृक असणं गरजेचं आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 15, 2020, 12:49 PM IST

ताज्या बातम्या