बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदी सुशील कुमार मोदींचे नाव निश्चित, आज होणार घोषणा

बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदी सुशील कुमार मोदींचे नाव निश्चित, आज होणार घोषणा

बिहारच्या मुख्यमंत्रिपदासाठी नितीश कुमार यांच्या नावाची फक्त औपचारिकता बाकी आहे. आज एनडीएची महत्त्वाची बैठक होणार आहे.

  • Share this:

पाटना, 15 नोव्हेंबर : बिहार विधानसभा निवडणुकीत (bihar assembly election 2020)बहुमतासह एनडीएने (NDA) बाजी मारली आहे. त्यामुळे बिहारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा रंगली असताना उपमुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी (sushil kumar modi) यांचं नाव हे उपमुख्यमंत्रिपदासाठी निश्चित झाले आहे.

बिहारच्या मुख्यमंत्रिपदासाठी नितीश कुमार यांच्या नावाची फक्त औपचारिकता बाकी आहे. आज एनडीएची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. यात नितीश कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्याआधी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांचं नाव उपमुख्यमंत्रिपदासाठी निश्चित झाले आहे. सुशील कुमार मोदी यांची भाजपच्या विधानसभेच्या नेतेपदावर निवड होणार आहे. आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.

दरम्यान, बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदासाठी सुशील कुमार मोदी यांच्याऐवजी नवीन चेहऱ्याला संधी दिली जाईल, अशी शक्यता होती. यात दलित नेते कामेश्वर चौपाल यांचे नाव आघाडीवर होते. पण, आता पुन्हा एकदा मोदी यांच्याच गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडणार आहे.

दरम्यान,  बिहारमध्ये आता सत्ता स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. एनडीएकडे स्पष्ट बहुमत आहे. पण, तरीही सत्ता स्थापन होईपर्यंत दोन्ही पक्षांमध्ये धाकधुक वाढली आहे. त्यामुळेच एनडीएकडून आज महत्त्वाची बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला भाजपचे सर्व वरिष्ठ नेते हजर असणार आहे. या बैठकीला  देवेंद्र फडणवीस सुद्धा पाटण्यात दाखल झाले आहे.

पाटन्यात भाजपच्या मुख्य कार्यालयात एनडीएची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत विधानसभेच्या गट नेतेपदाची निवड केली जाण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या गटनेत्याची निवड झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत चर्चा केली जाईल. त्यानंतर एनडीएचे सर्व घटकपक्ष राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करतील.

Published by: sachin Salve
First published: November 15, 2020, 12:50 PM IST
Tags:

ताज्या बातम्या