मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Sachin Vaze Case: सचिन वाझे प्रकरणात चावी ठरणार महत्त्वाचा पुरावा

Sachin Vaze Case: सचिन वाझे प्रकरणात चावी ठरणार महत्त्वाचा पुरावा

Sachin Vaze Arrest Case Latest Update: हीच किल्ली आरोपीविरुद्ध सक्षम पुरावा ठरू शकते. म्हणून या चावीचा शोध घेण्यात येत आहे.

Sachin Vaze Arrest Case Latest Update: हीच किल्ली आरोपीविरुद्ध सक्षम पुरावा ठरू शकते. म्हणून या चावीचा शोध घेण्यात येत आहे.

Sachin Vaze Arrest Case Latest Update: हीच किल्ली आरोपीविरुद्ध सक्षम पुरावा ठरू शकते. म्हणून या चावीचा शोध घेण्यात येत आहे.

  ठाणे, 19 मार्च: मुंबईच्या रस्त्यावर स्फोटकांनी भरलेली हिरवी गाडी कुणी ठेवली आणि का याचा शोध NIA ची टीम घेत आहे. या प्रकरणी सचिन वाझेंना अटक केली असली तरी सध्या एका चावीचा शोध घेतला जात आहे. ही चावी त्चया हिरव्या रंगाच्या गाडीची आहे. याच किल्लीने कटाचा पर्दाफाश होणार आहे.

  दक्षिण मुंबईतील कारमायकल रोडवर 25 फेब्रुवारीला पार्क करण्यात आलेली हिरव्या रंगाची स्फोटकांनी भरलेली गाडी कोण चालवत होतं याचा उलगडा झालेला नाही. मुंबईतील बाबुलनाथ मंदिर, माहिम खाडी आणि ठाण्यातील वाझेंच्या साकेत कॉम्प्लेक्स या घरी तपासा करता NIA टीम घेऊन गेली होती. एनआयएला संशय आहे की, सचिन वाझे यांना 17 फेब्रुवारी च्या रात्री मनसुख मिश्रीलाल हिरेन यांनी हिरव्या रंगाच्या गाडीची चावी दिली होती. मुंबई पोलीस आयुक्तालयापासून काही अंतरावर असलेल्या हॉटेल शिवाला इथे ही देवाण घेवाण झाल्याचं तपासादरम्यान उघड झालं आहे.

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरील आणि मुंबई पोलिस आयुक्तलय पासून काही अंतरावर असलेल्या हॉटेल शिवाला इथे 17 फेब्रुवारीच्या रात्री मनसुख मिश्रीलाल हिरेन हे एका स्कॉर्पिओ गाडीतल्या चालकाशी दहा ते पंधरा मिनिटे चर्चा करत होते. या चर्चेनंतर मनसुख त्या मर्सडीज गाडीत बसून निघून गेले. ही तीच गाडी आहे जी नुकतीच एनआयएने जप्त केली आहे.

  सचिन वाझे प्रकरणात आतापर्यंत 5 गाड्या जप्त; NIA कडून मोठा खुलासा होण्याची शक्यता

  या गाडीचा चालक सचिन वाझेच होते असा NIA चा संशय आहे. स्वतः वाझे किंवा त्यांचा कोणी हस्तक असावा या दृष्टीने चौकशी सुरू आहे.

  हे प्रकरण मुंबई क्राईम ब्रँच कडे असताना याचा तपास सचिन वाझे स्वतःच करत होते. या दरम्यान ही गाडी कशी उघडण्यात आली, यासाठी मुंबई क्राईम ब्रांचच्या एका टीमने फॉरेन्सिक चाचणी केली होती. या चाचणी अहवालातून हे स्पष्ट होतंय की 17 फेब्रुवारी च्या रात्री मनसुख हिरेन यांनी ऐरोली मुलुंड या रोडवर पार्क केलेली हिरव्या रंगाची गाडी ज्याने कोणी चोरली ती गाडी एक तर उघडण्यासाठी कोणत्याही प्रकारची जबरदस्ती तसंच कोणत्याही प्रकारच्या हत्यारांचा वापर करण्यात आला नाही. गाडी एक तर बनावट चावीने किंवा खऱ्या चावीने उघडून गाडीची चोरी केली असावी असं फॉरेन्सिक अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

  Sachin vaze प्रकरणी आणखी एका पोलिसाला अटक होण्याची शक्यता

  हिरव्या रंगाची गाडी चोरल्यापासून ते ही गाडी 17 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान कोणाकडे होती आणि ती गाडी 25 फेब्रुवारी च्या रात्री कोणी कार माइकल रोडवर पार्क केली होती या सर्वच कटाचा उलघडा होण्यासाठी या हिरव्या रंगाच्या गाडीची चावी मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

  First published:

  Tags: Maharashtra, Mumbai News, Mumbai police, Nia, Sachin vaze