मुंबई, 18 मार्च : सचिन वाझे प्रकरणाचा तपास NIA दिला असून आतापर्यंत नवनवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत तब्बल 5 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या गाड्यांच्या माध्यमातून एनआयए आता कोणती माहिती समोर आणणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलं आहे. आतापर्यंत NIA ने स्कॉर्पिओ, इनोव्हा, प्रॅडो आणि एक मर्सिडीज गाडी जप्त केली असून गुरुवारी दुपारी दुसरी मर्सिडीज जप्त करून ती कार्यालयात आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पहिली मर्सिडीज सीएसएमटीजवळील एका पार्किंगमधून ताब्यात घेण्यात आली होती, त्यानंतर आणखी एक मर्सिडीज एनआयएच्या हाती लागली आहे. (5 vehicles seized so far in Sachin Waze case)
पहिल्या मर्सिडीजमध्ये केरोसीन, 5 लाखांची रोख, पैसे मोजण्याचं यंत्र, शर्ट सापडले होते. दुसऱ्या मर्सिडीजमधील वस्तुंमुळे आणखी खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे ही वाचा-Sachin Vaze प्रकरणी मुंबई पोलीस दलातील मोठ्या अधिकाऱ्यांची होणार चौकशी?
पहिल्या मर्सिडीजमध्ये काय आढळलं?
मागच्या मर्सिडीजमध्ये केरोसीन, ५5लाख रुपये रोख, एक पैसे मोजण्याचे मशीन आणि शर्ट सापडले होते. आता जप्त केलेली दुसरी मर्सिडीज कोण वापरत होते?, वाझेच वापरत होते का? असे प्रश्न आहेत. (5 vehicles seized so far in Sachin Waze case)
आतापर्यंत NIA ने सचिन वाझे प्रकरणात 5 गाड्या जप्त केल्या असून एक ट्रॅडो गाडी ही वाझेंच्या कंपाऊंडमधून ताब्यात घेतली आहे, अशी माहिती समोर आली आहे. ही गाडी अद्याप NIA च्या कार्यालयात आणण्यात आलेली नाही. याशिवाय एका स्कोडा गाडीचाही शोध घेतला जात असून आतापर्यंत 5 गाड्या NIA च्या हाती लागल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Sachin vaze