मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'सोनू सूदवर आयकर धाडी म्हणजे रडीचा डाव, हा पोरखेळ एकदिवस अंगावर उलटेल', शिवसेनेचा केंद्रावर निशाणा

'सोनू सूदवर आयकर धाडी म्हणजे रडीचा डाव, हा पोरखेळ एकदिवस अंगावर उलटेल', शिवसेनेचा केंद्रावर निशाणा

Saamana Editorial: सोनू सूदच्या घरी आणिऑफिसमध्ये छापे टाकल्यानं बरीच चर्चा रंगली. यावरुन शिवसेनेनं (Shivsena) आजच्या सामनाच्या (Saamana)अग्रलेखातून भाजपवर  (BJP) निशाणा साधला आहे.

Saamana Editorial: सोनू सूदच्या घरी आणिऑफिसमध्ये छापे टाकल्यानं बरीच चर्चा रंगली. यावरुन शिवसेनेनं (Shivsena) आजच्या सामनाच्या (Saamana)अग्रलेखातून भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे.

Saamana Editorial: सोनू सूदच्या घरी आणिऑफिसमध्ये छापे टाकल्यानं बरीच चर्चा रंगली. यावरुन शिवसेनेनं (Shivsena) आजच्या सामनाच्या (Saamana)अग्रलेखातून भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 17 सप्टेंबर: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याच्याशी संबंधित सहा ठिकाणी प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) बुधवारी छापे टाकले. सोनू सूदच्या घरी आणिऑफिसमध्ये छापे टाकल्यानं बरीच चर्चा रंगली. यावरुन शिवसेनेनं (Shivsena) आजच्या सामनाच्या (Saamana)अग्रलेखातून भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. सोनू सूदला खांद्यावर घेऊन मिरवणाऱ्यांत भाजप पुढे होता. सोनू सूद हा आपलाच माणूस असल्याचे त्यांच्याकडून सतत बिंबविण्यात येत होते, पण या सोनुने दिल्लीच्या केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक कार्यक्रमाचे 'ब्रॅण्ड ऍम्बेसेडर' म्हणून सामाजिक कार्य करायचे ठरवताच त्यांच्यावर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत,' अशी शंका शिवसेनेनं व्यक्त केली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये अभिनेता सोनू सूदने केलेल्या मदत कार्याचा देशभर गवगवा झाला. त्यातून सोनू सूदला ‘मसीहा’ ही पदवी आपसूकच बहाल झाली, अशा खोचक शब्दात शिवसेनेनं भाजपवर टीका केली आहे. भाजपाकडून आपल्या विरोधी विचारांच्या पक्षांना आणि व्यक्तींना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप आजच्या अग्रलेखात करण्यात आला आहे.

मित्रानेच तोडले हात-पाय, शिरही केलं धडावेगळं, मुंबईतील थरारक घटनेचं उलगडलं गूढ

काय आहे आजच्या सामनाच्या अग्रलेखात

विध्वंसक, चुकीच्या माणसांना हाती धरायचे, त्यांना आर्थिक आणि दिल्लीच्या सत्तेचे पाठबळ द्यायचे आणि महाराष्ट्रातल्या लोकांवर घाणेरडे आरोप करायचये. त्या आरोपांची थुंकी झेलण्यासाठी मग तपास यंत्रणा तयारच आहेत.

भाजपा हा जगातील सर्वाधिक सदस्य असलेला पक्ष आहे. मोठ्या राजकीय पक्षाचे मनही मोठे असायला हवे. विरोधी पक्षांची राज्याराज्यांतील सरकारे किंवा वेगळ्या विचारांचे लोक यांचा आदर राखण्यातच राज्यकर्त्यांचे मोठएपण आहे. महाराष्ट्रातल्या मंत्र्यांच्या मागे खोटे आरोप लावणे, राज्यपालांनी वरच्या दबावामुळे १२ आमदारांची नियुक्ती रोखणे, सोनू सूदसारख्यांवर आयकर धाडी घालणे हे कोत्या मनाचे लक्षण आहे. हे रडीचे डाव आहेत. त्या डावांचा पोरखेळ एक दिवस उलटा पडल्याशिवाय राहणार नाही.

जे भाजपाशी संबंधित नाहीत, अशांचा तपास यंत्रणांच्या माध्यमातून बंदोबस्त करणे हे धोरण ठरलं आहे. त्यातून राज्यातील मंत्री सुटले नाहीत तसे सोनू सूदसारखे कलाकार आणि सामाजिक कार्य करणारेही सुटले नाहीत. भाजपाचे काही चवचाल पुढारी हे स्वत:च्या बाथरूममध्ये घुसावेत, तसे रोज ईडीच्या कार्यालयात जाऊन मोकळे होत आहेत. इतका आत्मविश्वास आणि धैर्य वरच्यांच्या पाठबळासिवाय येणं शक्यच नाही.

मुंबईत बांधकाम सुरु असलेल्या ब्रिजचा भाग कोसळला, 13 कामगार जखमी 

सोनू कोरोना काळात मजुरांना मदत करीत होता. सोनूने देशातील 16 शहरांत ऑक्सिजन प्लॅण्ट लावले, स्कॉलरशिपची योजना सुरू केली. त्या माध्यमांतून त्याचा बोलबाला झाला. या कार्यक्रमांना भाजपचे लोकही उपस्थित राहत. महाराष्ट्राच्या राज्यपाल महोदयांनी सोनूस राजभवनावर बोलावून खास चहापान केले. तोपर्यंत सोनू हा या मंडळींना आपला, म्हणजे भाजपचा अंतरात्मा वाटत होता. सोनू महाशय जे महान समाजकार्य करीत आहेत त्यामागे फक्त भाजपचीच प्रेरणा, परंपरा आहे, असे ठासून सांगितले जात होते, पण सोनूच्या समाजकार्याशी पंजाब, दिल्लीसारख्या सरकारांनी हात मिळविण्याचा प्रयत्न करताच सोनू सूद म्हणजे करबुडवा असे ठरविण्यात आले.

''भारतीयांनो, तीन महिने महत्त्वाचे...सण साजरे करताना जबाबदारी विसरू नका'' 

आयकर विभागाने सोनूला पिळून काढल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. जे भाजपशी संबंधित नाहीत अशांचा तपास यंत्रणांच्या माध्यमातून बंदोबस्त करायचा हे एक धोरण ठरले आहे. त्यातून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे मंत्री सुटले नाहीत तसे सोनू सूदसारखे कलाकार व सामाजिक कार्य करणारेही सुटले नाहीत.

First published:

Tags: BJP, Shivsena, Sonu Sood, Sonu sood angel