मुंबई, 17 सप्टेंबर: मुंबईत पुन्हा एकदा ब्रिज दुर्घटना घडल्याचं समोर येत आहे. मुंबईतल्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC main road) भागात बांधकाम सुरु (under construction) असलेल्या एका ब्रिजचा भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत ब्रिजचं बांधकाम करणारे 13 कामगार जखमी झालेत. पहाटे 4.40 च्या सुमारास ही घटना घडली आहे. (BKC under construction flyover collapsed) जखमी कामगारांना जवळच्या बीएन देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सुदैवानं अद्याप जीवितहानीचं वृत्त समोर आलेलं नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले. सध्या घटनास्थळावर मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात आहेत. घटनास्थळी पोहोचून अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी बचाव कार्य सुरु केलं आहे. अग्निशमन दलाची टीम शोध मोहीम राबवत आहे.
ACCIDENT | 14 labourers injured in #Mumbai after a part of under-construction bridge joining BKC to SCLR collapsed at 4.30 am today.
— Vinaya Deshpande (@vinivdvc) September 17, 2021
Minor injuries. Nobody missing, says @MumbaiPolice
24 labourers, 2 engineers, 2 supervisors were working there
Cause not yet known @CNNnews18 pic.twitter.com/wVc7s0krqW
दुर्घटनेदरम्यान मेट्रो पुलावर काम सुरू होतं. काही कामगार ब्रिजच्या वर काम करत होते तर काही खाली होते. ब्रिजच्या वर काम करणारे कामगार ब्रिज कोसळताच सिमेंट बार किंवा सळ्या पकडून उडी मारू लागले. काही कामगार जवळच्या पाण्याच्या टाकीत पडले आणि काही लोक ब्रिजखाली दबले गेले आणि जखमी झाले.
या दुर्घटनेत ब्रिजचं बांधकाम करणारे 13 कामगार जखमी झालेत. पहाटे 4.40 च्या सुमारास ही घटना घडली आहे. pic.twitter.com/GQFkTzmgtc
— News18Lokmat (@News18lokmat) September 17, 2021
अशाप्रकारे 13 हून अधिक कामगार या दुर्घटनेत जखमी झाले. एकूण 24 कामगार, 2 पर्यवेक्षक आणि 2 अभियंते येथे ब्रिजवर काम करत होते.