• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Corona Virus In India: 3 महिने अत्यंत महत्वाचे, सण साजरे करताना जबाबदारी विसरू नका, लसीकरण आवश्यक: केंद्र सरकार

Corona Virus In India: 3 महिने अत्यंत महत्वाचे, सण साजरे करताना जबाबदारी विसरू नका, लसीकरण आवश्यक: केंद्र सरकार

Corona Virus In India: गणेशोत्सव सुरु आहे आणि येत्या दोन महिन्यात अनेक सण देशात साजरे होणार आहे. यामुळे लसीकरणावर (Vaccination) पुन्हा एकदा भर देण्यात आला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 17 सप्टेंबर: देशात कोरोनाच्या (Corona Virus In India) तिसऱ्या लाटेचा (Third Wave) धोका वर्तवण्यात आला आहे. अशातच गणेशोत्सव सुरु आहे आणि येत्या दोन महिन्यात अनेक सण देशात साजरे होणार आहे. यामुळे लसीकरणावर (Vaccination) पुन्हा एकदा भर देण्यात आला आहे. सणांचे दिवस पाहता गुरुवारी केंद्र सरकारने (Central Government) पुन्हा एकदा कोरोना लसीकरणावर (Covid Vaccination) भर दिला आहे. यासोबतच सण साजरे करताना जबाबदारी विसरू नका अशा सूचनाही सरकारने दिल्या आहेत. सणांच्या दिवसात मास्क लावायला विसरू नका आणि सोशल डिस्टन्सिंग नियम लक्षात ठेवा, अशा स्पष्ट सूचना केंद्रानं दिल्या आहेत. मिझोरममधील कोरोनाच्या स्थितीबाबत केंद्राकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय, देशातील कोविड पॉझिटिव्हिटी रेट गेल्या 11 आठवड्यांपासून 3 टक्क्यांच्या खाली राहिला आहे.

  कोरोना लढ्यात भारताची कमाल! यूके, यूएससह 18 देशांना एकत्र जमलं नाही ते एकट्याने करून दाखवलं

   इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे डायरेक्टर बलराम भार्गव यांनी म्हटलं की, कोरोनाविरोधात राज्यांकडून पावले उचलली जात आहेत. केरळसारख्या राज्यांमध्ये संक्रमणाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. कोरोनाची वाढती प्रकरणे रोखण्यासाठी इतर राज्येही यशस्वी होतानाच चित्र आहे. तरीही आपल्याला माहित आहे की सण जवळ येत आहेत आणि गर्दी जास्त असल्याने व्हायरस पसरण्यास मदत होते. हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.
  सुचवले चार उपाय डॉ भार्गव यांनी कोरोनाची गती थांबवण्यासाठी चार उपाय सुचवले आहेत. यामध्ये कोविड लसीसाठी वाढती स्वीकृती, आवश्यकतेनुसार केवळ नियमांचे पालन करून प्रवास करणे, जबाबदारीने सण साजरा करणे, कोरोनाशी संबंधित नियमांचे योग्य प्रकारे पालन करणे यांचा समावेश आहे.

  मुंबईकरांवर बाप्पाने केली कृपा! गणेशोत्सवातच मिळाली मोठी GOOD NEWS

   कोरोनाबाबत कोविड टास्क फोर्सचे प्रमुख व्ही के पॉल म्हणाले- 'देशभरात कोविडची परिस्थिती आता स्थिर होत आहे. पण मिझोराम राज्य चिंतेचा विषय बनला आहे. येणारे तीन महिने अत्यंत महत्त्वाचे असतात, जेव्हा सणांचा कालावधी येतो. विशेषतः ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. जर परिस्थिती आता स्थिर असेल तर ती कायम ठेवावी लागेल. लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं आणि राज्यांनी आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहावे.
  Published by:Pooja Vichare
  First published: