जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / RTO Rule : अल्पवयीन मुलांना गाडी चालवायला देता? पालकांनो सावधान, बसेल मोठा दंड

RTO Rule : अल्पवयीन मुलांना गाडी चालवायला देता? पालकांनो सावधान, बसेल मोठा दंड

अल्पवयीन मुलांसाठी आरटीओचे नियम

अल्पवयीन मुलांसाठी आरटीओचे नियम

RTO Rule : आरटीओने अल्पवयीन मुलांच्या ड्रायव्हिंग संबंधित नियमांमध्ये कठोर बदल केले आहेत. ज्याचा दंड आता पालकांना बसणार आहे. जाणून घेऊया बदललेला नियम काय?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    RTO Rule : अल्पवयीन मुलांना दुचाकी किंवा चार चाकी चालवताना आपण अनेकदा पाहतो. आपल्यातील अनेकांची मुलं देखील कमी वयातच गाडी चालवायचा लागतात. मात्र पालकांनो आता सावध व्हा. कारण आरटीओ ने या संदर्भात कठोर नियम लागू केले आहेत. अल्पवयीन ड्रायव्हर्समुळे होणारे रस्ते अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आरटीओने हा निर्णय घेतलाय. यानुसार आता अल्पवयीन ड्रायव्हर्सच्या पालकांना कठोर दंड आकराण्यात येईल. या नियमात नेमकं काय? कितीचा दंड बसेल? 18 वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं-मुली गाडी चालवत असल्याचं आपण अनेकदा पाहतो. मात्र असं करणं आता पालकांना महागात पडणार आहे. कारण अल्पवयीन मुलांनी वाहन चालवल्यास त्यांना तब्बल 25 हजारांचा दंड आकारण्यात येणार आहे. एवढंच नाही तर वाहन चालक, मालक आणि पालकांना जवळपास 3 वर्षांपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा देखील होईल. यासोबतच दंडात्मक कारवाई झाली तर वयाच्या 25 वर्षापर्यंत संबंधित मुला-मुलींना लायसन्समही मिळणार नाही किंवा 1 वर्षांपर्यंतची वाहन नोंदणी देखील रद्द केली जाऊ शकते. यामुळे रस्त्यावर वाहनं चालवता येणार नाहीत. अल्पवयीन मुलं गाडी चालवत असल्यामुळे त्यांच्या जीवासोबतच रस्त्यावरील इतर नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण होतो. यामुळेच आरटीओने हा निर्णय घेतला आहे. नंबर प्लेटवरून गाडीची माहिती कशी चेक करायची? जाणून घ्या अधिक डिटेल्स मोडले जातात नियम मोटार वाहन कायद्यानुसार 18 वर्षांखालील व्यक्तींना कोणत्याही सार्वजनिक परिसरामध्ये वाहन चालवण्याची परवानगी नाही. यासोबतच, ते किमान 16 वर्षे वयाच्या व्यक्तींकडून 50 सीसी पेक्षा जास्त नसलेल्या इंजिन क्षमतेसह मोटरसायकल चालवण्यास परवानगी देते. मात्र हा नियम खुलेआम पायदळी तुटवला जात असल्याचं आपण अनेकदा पाहतो. याला आळा घालण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. ड्रायव्हिंग लायसन्ससह RTO च्या 58 सेवा घरबसल्या ऑनलाईन मिळणार! फक्त एक डॉक्युमेंट आवश्यक आयुक्तांनी जारी केलंय पत्र 16 जून रोजी जारी केलेल्या पत्रात ( FPJ प्रत आहे) राज्य परिवहन आयुक्तांनी अल्पवयीन वाहन चालविण्याशी संबंधित विद्यमान मार्गदर्शक तत्त्वे आणि परिपत्रकांची कठोर अंमलबजावणी होत नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली. राज्यभरातील दुचाकी चालकांसाठी रस्ता सुरक्षा आणि कायदेशीर तरतुदींवर विशेष लक्ष केंद्रित करून मोटार वाहन कायद्याची कठोर अंमलबजावणी सुनिश्चित करणे हे अलीकडील अधिसूचनेचे उद्दिष्ट आहे. या पत्रामध्ये लिहिलेय की, रस्ते अपघातांमुळे महाराष्ट्रामध्ये दरवर्षी अंदाजे 15,000 लोकं जीव गमावतात. जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये झालेल्या अपघातांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त अपघात हे दुचाकी चालकांचे होते. यामध्ये तब्बल 7,700 लोकांचा मृत्यू झाला आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात