मराठी बातम्या /बातम्या /मनी /

ड्रायव्हिंग लायसन्ससह RTO च्या 58 सेवा घरबसल्या ऑनलाईन मिळणार! फक्त एक डॉक्युमेंट आवश्यक

ड्रायव्हिंग लायसन्ससह RTO च्या 58 सेवा घरबसल्या ऑनलाईन मिळणार! फक्त एक डॉक्युमेंट आवश्यक

ड्रायव्हिंग लायसन्ससह RTO च्या 58 सेवा घरबसल्या ऑनलाईन मिळणार! फक्त एक डॉक्युमेंट आवश्यक

ड्रायव्हिंग लायसन्ससह RTO च्या 58 सेवा घरबसल्या ऑनलाईन मिळणार! फक्त एक डॉक्युमेंट आवश्यक

आधार व्हेरीफिकेशनच्या आधारावर, कोणताही नागरिक 58 आरटीओ सेवा ऑनलाइन घेऊ शकतो. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटले आहे की अशा सेवा कॉन्टॅक्टलेस आणि फेसलेस पद्धतीने दिल्याने लोकांचा वेळ वाचेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 18 सप्टेंबर : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) नागरिकांसाठी ड्रायव्हिंग लायसन्सपासून वाहन नोंदणीपर्यंतची प्रक्रिया सुलभ केली आहे. आता ड्रायव्हिंग लायसन्स आणि कंडक्टर लायसन्स ते परमिट इत्यादींशी संबंधित 58 सेवा ऑनलाइन घेता येतील. आता या कामांसाठी लोकांना त्यांच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. याबाबत MoRTH ने नुकतीच अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेत म्हटले आहे की 18 नागरिक-केंद्रित सेवा 58 पर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. आता नागरिकांना घरबसल्या या सेवांचा सहज लाभ घेता येणार आहे.

आधार पडताळणी महत्त्वाची

आधार व्हेरीफिकेशनच्या आधारावर, कोणताही नागरिक 58 आरटीओ सेवा ऑनलाइन घेऊ शकतो. मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, ऐच्छिक आधारावर आधार व्हेरीफिकेशनच्या मदतीने ड्रायव्हिंग लायसन्स आणि सर्व प्रकारच्या सेवांचा लाभ घरबसल्या घेता येतो. ऑनलाइन लाभ घेण्यासाठी ज्या सेवांना आधार व्हेरीफिकेशनच्या करावी लागेल त्यामध्ये शिकाऊ वाहन परवाना, डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स आणि ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण यासाठी अर्ज आहेत. जर तुम्हाला घरबसल्या या सेवांचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला आधार व्हेरीफिकेशन करावं लागेल. यासाठी ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज भासणार नाही. इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट जारी करणे, कंडक्टरच्या परवान्यात पत्ता अपडेट करणे, वाहन हस्तांतरणासाठी अर्ज देखील आता ऑनलाइन करता येणार आहे. यासाठी देशातील नागरिकाला ऐच्छिक आधारावर आधार पडताळणीच्या प्रक्रियेतून जावे लागेल.

वाचा - EV Range: लाँग ड्राईव्हलाही वापरू शकता इलेक्ट्रिक कार, फक्त लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

जर तुमच्याकडे आधार नसेल तर?

अधिसूचनेनुसार, ज्या व्यक्तीकडे आधार क्रमांक नाही तो CMVR 1989 नुसार संबंधित प्राधिकरणाकडे पर्यायी दस्तऐवज सबमिट करून आपली ओळख प्रस्थापित करू शकतो. मात्र, तो ऑनलाइन आरटीओच्या सेवेचा लाभ घेऊ शकणार नाही. कोणत्याही कामासाठी त्याला प्रादेशिक परिवहन कार्यालयात जावे लागते.

लोकांचा वेळ वाचणार

मंत्रालयाने म्हटले आहे की कॉन्टॅक्टलेस आणि फेसलेस अशा सेवा प्रदान केल्याने लोकांचा महत्त्वपूर्ण वेळ वाचेल. यासोबतच लर्नर ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्यासारख्या गोष्टी सोप्या होणार आहेत. त्यामुळे आरटीओ कार्यालयातील गर्दी कमी होणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH) लोकांसाठी वाहतूक संबंधित सेवा सुलभ करण्याचा प्रयत्न करत आहे.

First published:

Tags: Driving license, RTO