मुंबई, 15 डिसेंबर : जुनी, वापरलेली कार खरेदी करण्याच्या तयारीत असलात किंवा रस्त्यावर एखादा अपघात झाला, तर अशा वेळी संबंधित गाडीचा क्रमांक खूप उपयुक्त ठरतो. वाहनाच्या नंबर प्लेटवर असलेल्या क्रमांकावरून ते वाहन कोणाचं आहे हे तुम्ही सहजपणे जाणून घेऊ शकता; पण ही माहिती मिळवायची कशी, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ही माहिती ऑनलाइन मिळवणं आता सोपं झालं आहे. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. या स्टेप्सच्या मदतीने तुम्ही कोणत्याही वाहनाच्या क्रमांकावरून वाहन मालकाची माहिती सहजपणे मिळवू शकता.
तीन पद्धतींनी मिळवता येईल माहिती
स्मार्टफोन किंवा कम्प्युटरच्या माध्यमातून ही माहिती मिळवण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे; मात्र यासाठी तुम्हाला गाडीचा रजिस्ट्रेशन क्रमांक माहिती असणं गरजेचं आहे. हा क्रमांक गाडीच्या नंबर प्लेटवर लिहिलेला असतो. हा क्रमांक माहिती असेल तर तुम्ही तीन पद्धतींनी वाहनाशी संबंधित संपूर्ण माहिती मिळवू शकता. एको अॅप, परिवहन विभागाची वेबसाइट किंवा एसएमएसच्या माध्यमातून ही माहिती मिळवता येते.
हेही वाचा : ब्लड शुगर वाढण्यामागचं 'हे' कारण वाचून व्हाल हैराण; मानसिकतेशी आहे संबंध
ACKO App वर या स्टेप्स करा फॉलो
स्टेप 1 - सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरवरून ACKO App डाउनलोड करा.
स्टेप 2 - या अॅपमध्ये तुमच्या मोबाइल क्रमांकाच्या आधारे लॉग इन करा.
स्टेप 3 - त्यानंतर तुम्हाला अॅपवर उपलब्ध असलेल्या सेवांची माहिती दिसेल. त्यात आरटीओ इन्फो हा ऑप्शन असेल, त्यावर क्लिक करा.
स्टेप 4 - यात गाडीचा रजिस्ट्रेशन क्रमांक टाका आणि ग्रीन अॅरोवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला संबंधित वाहनाशी निगडित सर्व माहिती मिळेल.
परिवहन विभागाच्या वेबसाइटवर 'या' स्टेप्स करा फॉलो
स्टेप 1 - सर्वप्रथम तुमचा कम्प्युटर किंवा मोबाइलवर परिवहन विभागाची वेबसाइट सुरू करा.
स्टेप 2 - वेबसाइट ओपन झाल्यावर informational Services या ऑप्शनवर क्लिक करा. तिथे तुम्हाला ड्रॉप डाउन लिस्टमध्ये Know Your Vehicle details हा ऑप्शन दिसेल.
स्टेप 3 - तिथे तुम्हाला कदाचित लॉगइन करावे लागू शकते. तुम्ही तुमचा मोबाइल नंबर किंवा ई-मेल आयडीच्या मदतीने लॉगिन करू शकता.
स्टेप 4 - लॉगिन केल्यावर पोर्टलवर तुम्हाला संबंधित गाडीचा क्रमांक टाइप करण्यासाठी मोकळी स्पेस दिसेल. क्रमांक एंटर केल्यावर कॅप्चा कोड भरावा. सर्च ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला संबंधित गाडीची सर्व माहिती मिळेल.
हेही वाचा : World's Fastest Electric Car: मुंबई ते कोल्हापूर अवघ्या एका तासात, ‘या’ इलेक्ट्रिक कारचा नादच खुळा
एसएमएसवर माहिती हवी असेल, तर 'या' स्टेप्स करा फॉलो
स्टेप 1 - तुम्हाला ज्या वाहनाचा सविस्तर तपशील हवा आहे, त्या वाहनाचा क्रमांक तुमच्या मेसेजमध्ये टाइप करा. त्यापूर्वी VAHAN असं लिहून स्पेस द्या. उदाहरणार्थ, VAHAN mp 02 TA 1**2
स्टेप 2 - टेक्स्ट प्लेसवर ही माहिती भरल्यानंतर ती 7738299899 या क्रमांकावर सेंड करा. त्यानंतर काही वेळातच तुम्हाला फोनच्या मेसेजमध्ये संबंधित वाहनाची सर्व माहिती मिळेल.
या सुविधांची गरज का?
कोणत्याही वाहनाच्या नंबर प्लेटशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी या सेवा-सुविधा आवश्यक आहेत. अपघाताच्या वेळी अपघातास कारणीभूत असलेल्या वाहनचालकाची माहिती घेण्यासाठी या सुविधा फायदेशीर ठरतात. जुनी किंवा वापरलेली गाडी खरेदी करतानादेखील या क्रमांकाच्या आधारे वाहनमालकाची सर्व माहिती मिळवता येते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.