मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कोयत्याचा धाक दाखवून दारूच्या दुकानातून लुटले 35 हजार रुपये, पुण्यातील घटनेचा LIVE VIDEO

कोयत्याचा धाक दाखवून दारूच्या दुकानातून लुटले 35 हजार रुपये, पुण्यातील घटनेचा LIVE VIDEO

दोन तरुण हातात कोयता घेऊन दुकानात घुसले आणि शिवीगाळ करत गोंधळ घातला.

दोन तरुण हातात कोयता घेऊन दुकानात घुसले आणि शिवीगाळ करत गोंधळ घातला.

दोन तरुण हातात कोयता घेऊन दुकानात घुसले आणि शिवीगाळ करत गोंधळ घातला.

पिंपरी चिंचवड, 20 डिसेंबर : पिंपरी चिंचवड (pimpari chinchvad) शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. कोयत्याचा धाक दाखवून दारू दुकानाच्या (Liquor store) गल्ल्यातील 35 हजार लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सांगवीतील एम. यु. शितोळे देशी दारू दुकान आणि बिअरशॉपीमध्ये घडली आहे. दोन तरुण हातात कोयता घेऊन दुकानात घुसले आणि शिवीगाळ करत गोंधळ घातला. दुकानातील कामगारांनी या दोघांना अडवण्याचा प्रयत्न केला पण कोयत्याचा धाक दाखवला.

एका जणाने या दोघांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण दोघांनी कोयता उगारून त्याला बाजूला ढकले. त्यानंतर दुकानात घुसून दारूच्या गल्ल्यातील रक्कम लंपास केली. एकूण 35 हजारांची रक्कम या गुंडाने हिसकावून नेली. हा सगळा प्रकार दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद धाला.

याप्रकरणी बबन रामराव खराटे यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली. या प्रकरणी सांगवी पोलिसानी दोन अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाही.

तरुणीवर शारीरिक अत्याचार; अश्लील फोटो काढून तोतया डॉक्टरने काढला पळ

दरम्यान, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोनच दिवसांपूर्वी तडीपार गुंडानीन भर चौकात  दहा गोळ्या झाडून एका सराईताचा खून केल्याची घटना घडली होती. आता अशा पद्धतीने कोयत्याचा धाक दाखवून दमदाटी करत पैसे लुटण्याची घटना समोर आल्याने  पिंपरी शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याच बघायला मिळत आहे.

First published:

Tags: Pimpari chinchavad, Pune, Pune news