मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गुंगीचं औषध देत तरुणीवर शारीरिक अत्याचार; अश्लील फोटो काढून केलं ब्लॅकमेल, गुन्हा दाखल होताच फरार

गुंगीचं औषध देत तरुणीवर शारीरिक अत्याचार; अश्लील फोटो काढून केलं ब्लॅकमेल, गुन्हा दाखल होताच फरार

Young girl abused by bogus doctor: तोतया डॉक्टरने एका तरुणीवर शारीरिक अत्याचार केल्याचा प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे.

Young girl abused by bogus doctor: तोतया डॉक्टरने एका तरुणीवर शारीरिक अत्याचार केल्याचा प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे.

Young girl abused by bogus doctor: तोतया डॉक्टरने एका तरुणीवर शारीरिक अत्याचार केल्याचा प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे.

नांदेड, 20 डिसेंबर : उपचार घेण्यासाठी आलेल्या एका तरुणीला गुंगीचे औषध देऊन तोतया डॉक्टरने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात (Kinvat Taluka Nanded) हा प्रकार घडला आहे. नेवाकुमार मंडल असे आरोपीचे नाव आहे. तो मूळचा छत्तीसगडचा रहिवासी आहे. साई क्लिनीक नावाने त्याने दवाखाना थाटला होता. (young girl physical abused by bogus doctor in nanded)

अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल

काही महिन्यांपूर्वी त्याच्या दवाखान्यामध्ये पीडित तरुणी उपचारासाठी आली होती. तेव्हा त्याने तरूणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केले. शिवाय अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल करून सतत संबध ठेवले. हा प्रकार तरुणीच्या कुटुंबाबियाला माहिती झाल्यानंतर याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आली. याप्रकरणी इस्लापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीने काढला पळ

आपल्या विरोधात पीडित मुलीच्या आई-वडिलांकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आरोपीला लागली होती. ही माहिती मिळताच आरोपी तोतया डॉक्टर याने पळ काढला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली असून आता पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

वाचा : दिराने डॉक्टर वहिनीवर गोळ्या झाडत स्वतःही केली आत्महत्या; कारण जाणून हादराल

लैंगिक समस्येवर उपचारासाठी गेला अन् भलतीच समस्या घेऊन आला

जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील कोळगाव येथील एका 40 वर्षीय रुग्णासोबत विचित्र प्रकार घडला आहे. लैंगिक समस्येवर जडीबुटीचा उपचार घेणं संबंधित रुग्णाला चांगलंच महागात पडलं आहे. जडीबुटीचा उपचार करण्याच्या नावाखाली रुग्णाचे विवस्त्र फोटो काढून त्याला ब्लॅकमेल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीनं संबंधित फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादीकडून लाखो रुपये उकळले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.

वैदू सुरजसिंग चितोडिया असं अटक केलेल्या 19 वर्षीय आरोपी तरुणाचं नाव असून तो भुसावळ येथील रहिवासी आहे. आरोपी वैदू सुरजसिंग हा रस्त्यावर तंबू टाकून जडीबुटीच्या माध्यमातून लोकांचा उपचार करतो. आरोपी वैदू याने गावातील 40 वर्षीय स्थानिक रुग्णाला हेरून त्याचा विश्वास संपादन केला. लैंगिक समस्या सोडवण्यासाठी तंबूत उपचार करावे लागतील, असं त्याने फिर्यादीला समजावलं.

First published:

Tags: Crime, Nanded