लस येत नाही तोपर्यंत निर्बंध कायम, मास्क न वापरणाऱ्यांबाबत गृहमंत्र्यांचे कठोर आदेश

लस येत नाही तोपर्यंत निर्बंध कायम, मास्क न वापरणाऱ्यांबाबत गृहमंत्र्यांचे कठोर आदेश

कोरोना काळात मास्क न वापणाऱ्यांबाबत गृहमंत्र्यांनी कठोर निर्णय घेतला आहे.

  • Share this:

नागपूर, 13 सप्टेंबर: नागपूर शहरासह ग्रामीण भागात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री नितीन राऊत, व पोलीस आयुक्त यांच्या उपस्थित रविवारी बैठक झाली. या बैठकीला सर्व विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोरोना काळात मास्क न वापणाऱ्यांबाबत गृहमंत्र्यांनी कठोर निर्णय घेतला आहे. नागपूरात मास्क न घालणाऱ्यांकडून 200 ऐवजी 500 रुपये दंड वसूल करा, असे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना दिले आहे. या आदेशाची अंमलबजावणी उद्यापासून (14 सप्टेंबर) होणार आहे.

हेही वाचा...ठरली रणनीती! मराठ्यांनी आंदोलनाबाबत घेतला मोठा निर्णय, सरकारला दिला सज्जड इशारा

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं की, नागपूर शहरातील अनेक दुकानदार आमि ग्राहक सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत नाही आहेत. मात्र, लॉकडाऊनला बरेच अधिकारी विरोध करत आहे. लॉकडॉऊनमुळे गरिब जनतेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याळे पुन्हा लॉकडाऊन नको, असं मत अधिकाऱ्यांनी मांडलं आहे. नागरिक मास्कचा वापर करीत नाही. नागरिक ऐकत नसतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करा, असे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत. मात्र, नागपूरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा नाही, असं गृहमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

महाराष्ट्राला बदनाम करण्याचा षडयंत्र...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राबद्दल केलेलं विधान योग्य आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरूवातीपासूनच सुरू आहे, असं सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील भाजपवर निशाणा साधला.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

महाराष्ट्रात कोरोनाचे संकट हे कायम आहे. हे संकट असताना राजकीय वादळ उठत आहे. महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जात आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. तसंच, लोकल सेवा, रेस्टॉरंट सुरू करण्यात येईल, याचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'फेसबुक लाईव्ह'च्या माध्यमातून राज्यातील जनतेला संबोधित केलं. मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाचे संकट संपले असं काही लोकांना वाटत आहे. त्यामुळे काही लोकांनी पुन्हा राजकारण सुरू केले आहे. महाराष्ट्राच्या बदनामी करण्याचा डाव आखला जात आहे. पण, मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलो आहे, त्यामुळे सर्व लक्षात ठेवून काम करतोय, अन्यथा उत्तर देण्यास कमी करणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला सणसणीत टोला लगावला आहे.

आता सारे काही खुले करतो आहोत म्हणजे काही जणांनी पुनश्च राजकारण सुरू केले आहे. मी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की माझ्याकडे काही उत्तर नाही. पण महाराष्ट्राच्या बदनामीचा जो काही डाव टाकला जात आहेत, राजकारण केले जात आहे त्यावर मी कधीतरी मुख्यमंत्रिपदाचा मास्क काढून नक्की बोलेल. पण आज माझ्या दृष्टीने कोरोना महत्वाचा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा...माँ जिजाऊ, सावूमाई, रमाई, भिमाई फक्त भाषणांपुरतचं का? महिला भाजप नेत्याचा सवाल

या प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्र सरकार खंबीरपणे पुढे चालले आहे. कोरोना अक्राळविक्राळ स्वरूप धारण करतो आहे. मी पूर्वी म्हटले होते की, तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो. यात आता मी थोडा बदल करून तुम्ही थोडी जबाबदारी घ्या, असे आवाहन करतो आहे आणि ती तुम्ही घेतलीच पाहिजे. महाराष्ट्रात महिनाभर एक मोहिम माझे कुटुंब, माझी जबाबदारी या नावाने राबविली जाईल. यामध्ये जात,पात, धर्म पक्ष बाजूला सारून आपण सर्वांनी सहभागी व्हावे. महाराष्ट्राला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपली स्वत:ची आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Published by: Sandip Parolekar
First published: September 13, 2020, 5:16 PM IST

ताज्या बातम्या