मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /माँ जिजाऊ, सावूमाई, रमाई, भिमाई फक्त भाषणांपुरतचं का? महिला भाजप नेत्याचा सरकारला सवाल

माँ जिजाऊ, सावूमाई, रमाई, भिमाई फक्त भाषणांपुरतचं का? महिला भाजप नेत्याचा सरकारला सवाल

हे लिहीत असतांना आग मस्तकात जात आहे...पुन्हा क्वारंटाईन सेंटरमध्ये 20 वर्षीय तरुणीवर मिराभाईंदरला तिथल्या सुरक्षारक्षकांकडून बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली.

हे लिहीत असतांना आग मस्तकात जात आहे...पुन्हा क्वारंटाईन सेंटरमध्ये 20 वर्षीय तरुणीवर मिराभाईंदरला तिथल्या सुरक्षारक्षकांकडून बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली.

हे लिहीत असतांना आग मस्तकात जात आहे...पुन्हा क्वारंटाईन सेंटरमध्ये 20 वर्षीय तरुणीवर मिराभाईंदरला तिथल्या सुरक्षारक्षकांकडून बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली.

मुंबई, 13 सप्टेंबर: ठाण्यातील मिरा भाईंदर येथील एका क्वारंटाईन सेंटरमध्ये 20 वर्षीय तरुणीवर तिथल्या सुरक्षारक्षकानं बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. यावरून भाजप महिला आघाडीच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. राज्यात 3 पक्षांचे 3 मुख्यमंत्री आणि एक सुपर मुख्यमंत्री असलेल्या सरकारमध्ये याची दखल तरी कोण घेणार? ही परिस्थिती आहे.

हेही वाचा...कॉलेज युवकाची निर्घृण हत्या करून झुडपात फेकला मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण

राज्यात भगिनींनी किती संताप, शोक व्यक्त करत बसायचयं आणि डोळ्यांसमोर महिला मुलींना उद्ध्वस्त होताना पाहायचं. एसओपीची (SOP)मागणी गेल्या 4 महिन्यांपासून सातत्यानं सरकारकडे करत आहे. इतर घटनेत तत्परता दाखवणारं सरकार महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर उदासीन का? माँ जिजाऊ, सावूमाई, रमाई, भिमाई फक्त भाषणांपुरतचं का? असा खोचक सवाल देखील चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

10 महिन्यांच्या चिमुकल्याच्या आईवर अत्याचार...

राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी ठिकठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. परंतु, ठाण्यातील कोविड सेंटरमध्ये सोईसुविधा देण्याच्या नावाखाली एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील कोविड सेंटरमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी एका 27 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. या नराधमाने एका 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड परिसरात हे कोविड सेंटर आहे. पीडित महिलेला आपल्या 10 महिन्याच्या मुलीसोबत एका खोलीत क्वारंटाइन करण्यात आले होते. याच सेंटरमध्ये तिच्या नात्यातील एक व्यक्तीला भेटायला गेली असता आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.

आरोपी हा पीडित महिलेला गरम पाणी देण्याच्या बहाण्याने खोलीत येत होता. काही दिवसांनी या नराधमाने लहान मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन पीडितेवर अत्याचार केले. या आरोपीने जूनच्या पहिल्या आठवड्यात या आरोपीने तीन वेळी पीडितेवर अत्याचार केला होता, अशी माहिती नवघर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत पाटील यांनी दिली.

हेही वाचा..भीषण अपघात गाडीचा झाला चक्काचूर, लोकांना बाहेर काढण्यासाठी आलं हेलिकॉप्टर

आपल्या कुटुंबाची बदनामी होईल या भीतीपोटी पीडित महिलेनं तेव्हा तक्रार दाखल केली नव्हती. पण, अखेर संतापाचा उद्रेक झाल्यामुळे या महिलेनं शनिवारी नवघर पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दाखल केली. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे.

First published:

Tags: BJP