रायगड, 9 सप्टेंबर: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धमकीचे फोन आल्यानं खळबळ उडाली आहे. त्यात मुख्यमंत्र्यांच्या फार्म हाऊसची रेकी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खालापूर तालुक्यातील भिलवले येथील बगंल्यावर मगंळवारी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास टुरीस्ट कारने आलेल्या 3-4 जणांनी रेकी केली. मुबंई दहशतवाद विरोधी पथकानं (ATS) नवी मुबंई टोल नाक्यावर आरोपींना ताब्यात घेतलं आहे. हेही वाचा… ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र महाराष्ट्रात मुघलाई अवतरल्याचं चित्र’ मिळालेली माहिती अशी की, खालापूर तालुक्यातील भिलवले येथील बगंल्यावर मगंळवारी सायंकाळी टुरीस्ट कारने काही लोक रेकी करण्यासाठी आले होते. 3 ते 4 जण होते. फार्म हाऊसच्या गेटवरील सुरक्षारक्षकांकडे या इम्तियाज नावाच्या व्यक्तीची चौकशी केली आणि नंतर कार मुबंईकडे रवाना झाली. घटनेचं प्रसंगावधान राखून फार्म हाऊसवरील सुरक्षारक्षकांनी गाडी नबंर नोट करून तातडीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मुबंई पोलिसांना कळवला. या घटनेची दखल घेत मुबंई ATSनं कार नवीमुबंई टोल नाक्यावर ताब्यात घेतली. काल रात्रीपासून आरोपींची ATS कडून कसून चौकशी सुरू आहे. हेही वाचा.. ऑफिस तोडल्याने भडकली कंगना, शिवसेनेची केली बाबरच्या सैन्याशी तुलना फार्म हाऊसबाहेर बंदोबस्तात वाढ… खालापूरला व फार्महाऊस पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. तसेच दगंल नियत्रंण पथकाचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक स्वत: खालापूर येथे उपस्थित असून ATSला तपासात सहकार्य करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.