Home /News /entertainment /

ऑफिस तोडल्याने भडकली कंगना, शिवसेनेची केली बाबरच्या सैन्याशी तुलना

ऑफिस तोडल्याने भडकली कंगना, शिवसेनेची केली बाबरच्या सैन्याशी तुलना

हे ऑफिस मला राम मंदिराप्रमाणेच आहे. आज इथं बाबर आले आहे. इतिहास पुन्हा एकदा घडणार आहे.

    मुंबई, 09 सप्टेंबर : अभिनेत्री कंगना रानावत आणि शिवसेनेत वाद आता शिगेला पोहोचला आहे. मुंबई पालिकेनं कंगनाच्या ऑफिसच्या अनधिकृत बांधकाम तोडले आहे. पालिकेच्या या कारवाईमुळे कंगना कमालीची भडकली आहे. कंगनाने एकापाठोपाठ एक ट्वीट करून शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. कंगनाने शिवसेनेची तुलना थेट बाबरशी केली आहे. कंगनाच्या ऑफिसवर तोडकाम करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी जेव्हा पोहोचले तेव्हा कंगनाने ही बाबरची सैन्य असल्याचे म्हटले आहे. कंगना एवढ्यावरच थांबली नाही. आपण मुंबईला पाकव्याप्त भाग म्हटलो होतो. आता हे काही चुकीचे नाही. कारण पालिका तशी कारवाईच करत आहे, असंही कंगनाने पुन्हा एकदा म्हटलं. त्याचबरोबर आपल्या ऑफिसची जेव्हा तोडफोड सुरू झाली होती तेव्हा कंगनाने हे पाकिस्तान आहे, असंही म्हटलं होतं. मणिकर्णिका सिनेमाची अयोध्येत घोषणा झाली होती. त्यामुळे हे ऑफिस मला राम मंदिराप्रमाणेच आहे. आज इथं बाबर आले आहे. इतिहास पुन्हा एकदा घडणार आहे. ज्या प्रकारे राम मंदिर पुन्हा बनले. तसेच हे ऑफिसही परत तयार होणार आहे, असंही कंगनाने सांगितले. दरम्यान, कंगनाच्या ऑफिसच्या तोडफोडीचे काम आता तुर्तास थांबवण्यात आले आहे. कंगनाच्या वकिलांनी घटनास्थळी पोहोचून पालिकेच्या अधिकाऱ्याला कायदेशीर कागदपत्र दाखवले आहे. तसंच, बांधकाम हे अधिकृत असल्याचा दावाही केला आहे. खुद्द कंगनाने ही ट्वीट करून बांधकाम अधिकृत असल्याचा दावा केला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Kangana ranaut, Mumbai, Shivsena

    पुढील बातम्या