मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /संजय राऊतांमुळेच शिवसेनेत उभी फूट? बंडखोर आमदार योगेश कदम यांचा गंभीर आरोप

संजय राऊतांमुळेच शिवसेनेत उभी फूट? बंडखोर आमदार योगेश कदम यांचा गंभीर आरोप

संजय राऊत (Sanjay Raut) यांना सर्व आमदार नाराज आहेत हे आधीच माहीत होतं. संजय राऊत यांच्यामुळे आमदारांमधील  मतभेदाची दरी अधिक वाढली, असा आरोप योगेश कदम यांनी केला

संजय राऊत (Sanjay Raut) यांना सर्व आमदार नाराज आहेत हे आधीच माहीत होतं. संजय राऊत यांच्यामुळे आमदारांमधील मतभेदाची दरी अधिक वाढली, असा आरोप योगेश कदम यांनी केला

संजय राऊत (Sanjay Raut) यांना सर्व आमदार नाराज आहेत हे आधीच माहीत होतं. संजय राऊत यांच्यामुळे आमदारांमधील मतभेदाची दरी अधिक वाढली, असा आरोप योगेश कदम यांनी केला

रत्नागिरी 10 जुलै : आमदार योगेश रामदास कदम (Yogesh Kadam) यांचं शनिवारी मतदारसंघात भव्यदिव्य स्वागत करण्यात आलं. तसंच कार्यकर्त्यांनी जल्लोषात खेड, दापोली आणि मंडणगड या तिन्ही तालुक्यांमध्ये मिरवणूक काढली. यानंतर त्यांनी दापोली इथे पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊतांमुळेच मतभेदाची दरी अधिक वाढली, असंही त्यांनी म्हटलं आहे.

' ....तर महान कलावंताची महाराष्ट्राला ओळख झालीच नसती' संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

संजय राऊत (Sanjay Raut) यांना सर्व आमदार नाराज आहेत हे आधीच माहीत होतं. संजय राऊत यांच्यामुळे आमदारांमधील मतभेदाची दरी अधिक वाढली. सेनेत असताना सेनेतीलच नेत्यांकडून आमचं होत असलेलं खच्चीकर यामुळे आम्ही वेगळी भूमिका घेतली. खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांमुळे शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांमध्ये मतभेदाची दरी अधिक वाढली, असा आरोप त्यांनी केला आहे.

बंड केलेल्या आमदारांमध्ये त्यांच्या बेताल वक्तव्यामुळे अधिक संताप निर्माण झाला, असं दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. संजय राऊत यांनी आमदार आणि महिला आमदारांबद्दल वापरलेले शब्द संताप आणणारे आहेत, असंही ते म्हणाले.

शिवसेनेवर कुणाचा हक्क?, दोन्ही गटाच्या आमदारांना मिळाली नोटीस

मला गेल्या अडीच वर्षात केवळ त्रासच दिला. शिवसेनेला आणि योगेश कदमला संपवण्यासाठीच निवडणुकीत पराभूत झालेल्या राष्ट्रवादीच्या आमदाराला आमच्याच शिवसेनेचे पालकमंत्री अनिल परब बळ देत होते. याबाबत अनेकदा सांगूनही मातोश्रीवरील चार जणांचे कोंडाळे ही माहिती पक्षप्रमुखांकडे पोहोचू देत नव्हते, असा खळबळजनक आरोपही आमदार योगेश कदम यांनी केला आहे.

First published:

Tags: Sanjay raut, Shivsena