जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Shinde Vs Thackeray : नाव अन् चिन्ह दोन्ही शिंदेंना, पाच मुद्यांनी समजून घ्या आयोगाचा निर्णय

Shinde Vs Thackeray : नाव अन् चिन्ह दोन्ही शिंदेंना, पाच मुद्यांनी समजून घ्या आयोगाचा निर्णय

Shinde Vs Thackeray : नाव अन् चिन्ह दोन्ही शिंदेंना, पाच मुद्यांनी समजून घ्या आयोगाचा निर्णय

निवडणूक आयोगाकडून शिवसेनेच्या घटनेवरही मत व्यक्त केलं आहे. शिवसेनेची घटना ही लोकशाहीला धरून नसल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

दिल्ली, 17 फेब्रुवारी : निवडणूक आयोगाने शिंदे विरुद्ध ठाकरे गटात शिवसेना आणि धनुष्यबाण यावरून सुरू असलेल्या वादावर मोठा निर्णय दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाला निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना हा सत्याचा विजय असल्याचं म्हटलं आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे दोन्हीही एकनाथ शिंदे यांच्याकडे राहील असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. 1. निवडणूक आयोगाकडून शिवसेनेच्या घटनेवरही मत व्यक्त केलं आहे. शिवसेनेची घटना ही लोकशाहीला धरून नसल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं.

जाहिरात

2. लोकशाही पायदळी तुडवून पक्षात पदाधिकाऱ्यांची कोणत्याही निवडणुकीशिवाय नियुक्ती केली असे निवडणूक आयोगाने म्हटले. 3. शिवसेना आणि धनुष्यबाण हे दोन्हीही एकनाथ शिंदे यांच्याकडे राहील असं केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटलंय. 4. शिवसेना पक्षाच्या घटनेत २०१८ मध्ये सुधारणा करण्यात आल्या त्याबाबत निवडणूक आयोगाला माहिती देण्यात आलेली नाही. 5. शिवसेनेच्या मूळ घटनेतील लोकशाहीविरोधातील नियम १९९९ मध्ये आय़ोगाने स्वीकारले नव्हते. ते नियम गुपचूपपणे घटनेत अॅड करण्यात आले असल्याचं निरीक्षण निवडणूक आयोगाने नोंदवले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात