जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'तर माझ्या पक्षाचं नाव आणि चिन्ह घ्या..'; रवी राणांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ऑफर

'तर माझ्या पक्षाचं नाव आणि चिन्ह घ्या..'; रवी राणांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ऑफर

'तर माझ्या पक्षाचं नाव आणि चिन्ह घ्या..';  रवी राणांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ऑफर

रवी राणा यांनी ट्विट करत म्हटलं की ‘शिंदे साहेब गरज पडल्यास माझा पक्ष आणि माझ्या पक्षाचं चिन्ह पाना घ्या.’

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

अमरावती 09 ऑक्टोबर : केंद्रीय निवडणूक आयोगाने चार तासांची बैठक घेऊन शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठावलं आहे. तसंच शिवसेना नाव वापरता येणार नाही. यामध्ये आता शिवसेनेसमोर दुसरे नाव जोडावे लागणार आहे. यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना आता नवं चिन्ह घ्यावं लागणार आहे. आता दोन्ही गट कोणतं चिन्ह घेतात हे सोमवारी समोर येणार आहे. यादरम्यान रवी राणा यांनी मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक ऑफर दिली आहे. Shivsena VS Shinde : शिवसेना संपणार का? शरद पवारांचे एका वाक्यात उत्तर, उद्धव ठाकरेंनाही दिला सल्ला आमदार रवी राणा यांचं ट्विट सध्या चर्चेत आहे. शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर रवी राणा यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. रवी राणा यांनी ट्विट करत म्हटलं की ‘शिंदे साहेब गरज पडल्यास माझा पक्ष आणि माझ्या पक्षाचं चिन्ह पाना घ्या. आपल्यासोबत उभा राहील. आपण युवा स्वाभिमान पार्टी आणि पाना चिन्ह घ्यावं’ असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता दोन्ही गटाला नवीन चिन्हाचा पर्याय शोधावा लागणार आहे. अशातच निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर आमदार रवी राणा हे एकनाथ शिंदे गटाच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरण्याची ऑफर दिली आहे. Kapil sibal election commission : शिवसेनेची भूमिकामांडणारे वकील कपील सिब्बलांची निवडणूक आयोगावर खरमरीत टीका दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सध्याच्या घडीला 197 फ्री निवडणूक चिन्ह आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाला यापैकी तीन चिन्हाचा पर्याय दिला जावू शकतो. आता दोन्ही गट कोणते चिन्ह घेतात हे सोमवारी समोर येणार आहे. दोन्ही त्यांना हवे असल्यास, त्यांच्या मूळ पक्षाशी जोडणारं चिन्ह निवडू शकतात. सध्याच्या पोटनिवडणुकासाठी त्यानुसार, दोन्ही गटांना याद्वारे 10 ऑक्टोबर 2022 दुपारी 01:00 पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात