मुंबई, 09 ऑक्टोबर : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. पण, हे होणारच होतं, याची मला खात्री होती. पण, यामुळे शिवसेना यामुळे संपणार नाही, ती आणखी जोमाने उभी राहील, असं भाकित राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने चार तासांची बैठक घेऊन शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठावलं आहे. तसंच शिवसेना नाव वापरता येणार नाही. यामध्ये आता शिवसेनेसमोर दुसरे नाव जोडावे लागणार आहे. या घटनेवर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली, शिवसेना अजिबात संपणार नाही, ती आणखी जोमाने वाढणार आहे. शिवसेनेमध्ये जी तरुणपिढी आहे, ती आणखी जोमाने काम करणारी आहे, असं शरद पवार म्हणाले. ‘निवडणुकामध्ये जर जायचे असेल तर आणि एखादी संघटना असेल. त्यावेळी चिन्ह असेल किंवा नसेल तरीही निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी दाखवली पाहिजे’ असा सल्लाही शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिला. ‘मला अजिबात आश्चर्य वाटत नाही, हा निर्णय होईल याची मला खात्री होती. अगदी निर्णय कोण घेणार याची माहिती नव्हती. निर्णय गुजरातमधून घेतले जातील याची खात्री देता येत नाही. त्यामुळे जे काही घडायचं ते घडलं आहे, अशी टीकाही शरद पवार यांनी केली. (‘खोकेवाल्या गद्दारांनी निर्लज्ज प्रकार केला पण..’; चिन्ह गोठवल्यानंतर आदित्य ठाकरेंचा संताप) दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव कॅम्प सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे. कायदेशीर तज्ञांसोबत चर्चा होत आहे, आव्हानाची व्याप्ती याबद्दल विचार केला जात आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, आता न्यायालयीन हस्तक्षेपाची व्याप्ती कमी आहे, तथापि, आदेशाला आव्हान दिले जाऊ शकते. त्यामुळे शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे. (Shivsena VS Shinde : ‘धनुष्यबाण’ आधी शिवसेनेकडे नव्हते, असे मिळवले निवडणूक चिन्ह!) दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सध्याच्या घडीला 197 फ्री निवडणूक चिन्ह आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाला यापैकी तीन चिन्हाचा पर्याय दिला जावू शकतो. आता दोन्ही गट कोणते चिन्ह घेतात हे सोमवारी समोर येणार आहे. दोन्ही त्यांना हवे असल्यास, त्यांच्या मूळ पक्षाशी जोडणारं चिन्ह निवडू शकतात. सध्याच्या पोटनिवडणुकासाठी त्यानुसार, दोन्ही गटांना याद्वारे 10 ऑक्टोबर 2022 दुपारी 01:00 पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







