Home /News /maharashtra /

आता डाव फडणवीसांच्या हातात, रोहित पवारांना शह देण्यासाठी राम शिंदेंना मंत्रिपद?

आता डाव फडणवीसांच्या हातात, रोहित पवारांना शह देण्यासाठी राम शिंदेंना मंत्रिपद?

 मागील निवडणुकीत रोहित पवार यांनी तत्कालीन मंत्री व पालकमंत्री राम शिंदे यांचा पराभव केला होता.

मागील निवडणुकीत रोहित पवार यांनी तत्कालीन मंत्री व पालकमंत्री राम शिंदे यांचा पराभव केला होता.

मागील निवडणुकीत रोहित पवार यांनी तत्कालीन मंत्री व पालकमंत्री राम शिंदे यांचा पराभव केला होता.

अहमदनगर, 05 जुलै - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी बहुमत सिद्ध करून दाखवले आहे.त्यामुळे आता शिंदे सरकार आता राज्यात स्थापन झालं आहे. राज्यात आता सत्तांतर झाल्याचे परिणाम अहमदनगर जिल्हावरही होणार आहेत. जिल्हावार वर्चस्व ठेवण्यासाठी सर्वच प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यात आपले वर्चस्वरावरून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) आणि भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील हे नेहमीच आमने-सामने असतात तर रोहित पवार (rohit pawar) यांना शह देण्यासाठी भाजपचे नेते राम शिंदे (ram shinde) यांना मंत्रिपद मिळू शकतं अशी शक्यता वर्तवली जात आहे. राज्यामध्ये सत्तांतर झाल्याने अनेक जिल्ह्यांचे समीकरणे आता बदलणार आहेत. याचा परिणाम अहमदनगर जिल्ह्यावर ती सुद्धा होणार असून शहाकाशाचा राजकारण आता जिल्हा पातळीवरती होणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये नेहमीच चर्चेला असलेले दोन विरोधक काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि लोकसभेत कोंडी झाल्याने काँग्रेस मधून भाजपात आलेले राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजकीय संघर्ष नेहमीच उफाळून येत असतो. हे दोन्हीही राजकीय विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी कधी सोडत नाही. सहकाराच्या माध्यमातून मंत्रिपद मिळवणं आणि आपलं सहकार आणि त्यातील प्राबल्य ठेवण्यासाठी मंत्रिपद किंवा आपला राजकीय धबधबा वापरणे हे नेहमीचच आहे. मधल्या काळात भाजपातून महाविकास आघाडीमध्ये येण्याचं प्रमाण वाढले होते त्यालाही सध्या खेळ बसेल कारण जिल्हा परिषदा पंचायत समित्या यांच्या निवडणुका भाजपा मोठ्या ताकतीने लढन त्यामुळे भाजपा सर्व स्तरावर लक्ष ठेवून आहेत. (अकलूजमध्ये पार पडले जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे रिंगण) अहमदनगर जिल्ह्यामध्ये सध्या भाजपाचे चार आमदार आहेत. राष्ट्रवादीमधून भाजपात केलेले बबनराव पाचपुते, भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील, मोनिका राजळे आणि विधान परिषदेवर निवडून आलेले आमदार राम शिंदे यांचा समावेश आहे. यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यामध्ये विखे विरुद्ध थोरात असा संघर्ष होता मात्र त्यामध्ये मागील निवडणुकीत पवार घराण्याची एंट्री अहमदनगर जिल्ह्यामध्ये रोहित पवार यांच्या रूपाने झाली. त्या निवडणुकीत रोहित पवार यांनी तत्कालीन मंत्री व पालकमंत्री राम शिंदे यांचा पराभव केला होता. त्यांच्या या दमदार एंट्रीमुळे अहमदनगरच्या जिल्ह्यामध्ये त्यांचा वर्चस्व वाढू लागले आहे, तसा प्रभावही मागच्या अडीच वर्षांमध्ये दिसलाय. त्यामुळे त्यांना शह देण्यासाठी आमदार राम शिंदे यांना मंत्रिपद दिले जाते का हे पाहावं लागेल. ('...तर तुमच्या पायाही पडू'; अजित पवारांच्या Video वर निलेश राणेंची प्रतिक्रिया) अहमदनगर जिल्ह्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदे यांना दोन मंत्रिपद मिळणार मात्र कुठलं वजनदार खाते मिळतं आणि पालकमंत्रिपद कुणाला मिळते हे पाहावे लागेल. जिल्ह्यात पूर्वी तीन मंत्री आणि हसन मुश्रीफ हे पालकमंत्री होते त्यामुळे जिल्ह्याचा विकास होऊ शकलं नाही असा आरोप भाजपाने केलाय. जिल्ह्यामध्ये येऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुका आणि पुढील विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता भाजपाचे पालकत्व असलेल्या भाजपाचे नेते आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात असल्यामुळे त्यांचाही लक्ष सध्या अहमदनगर वरती आहे त्यामुळे मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहावं लागेल.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या