पुणे, 05 जुलै : तुकाराम महाराज (tukaram maharaj) यांच्या पादुकांचे सराटी येथे निरेत स्नान (nira river) झाल्यानंतर पालखी अकलूज (tukaram maharaj palakhi akluj) नगरीत पोहचली आहे. अकलूजमध्ये आज 11 वाजता भव्य दिव्य रिंगण सोहळा संपन्न होणार झाला. (akluj ringan sohala) वारकरी आणि अकलूजकर रिंगण सोहळ्याचा थरार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने मैदानावर जमले होते. (ashadhi wari)
तुकाराम महाराजांच्या पालखीने इंदापूरमध्ये प्रवेश केल्यानंतर वाजत गाजत या पालखीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर येथील कदम महाविद्यालयाच्या प्रांगणात डोळ्याचं पारणं फेडणारं दुसरं रिंगण पार पडलं. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण बेलवंडीत पार पडलं आहे. यावेळी शेकडो वारकऱ्यांनी आणि भाविकांनी रिंगण पाहायला गर्दी केली होती. तर आज अकलूजच्या मैदानात रिंगण सोहळा पार पडणार आहे.
तिसरे गोल रिंगण 5 जुलै रोजी अकलूज माने विद्यालयात होणार आहे. पहिले उभे रिंगण 6 जुलै रोजी माळीनगर येथे, तर दुसरे उभे रिंगण 8 जुलै रोजी बाजीराव विहीर येथे होणार आहे. 9 जुलै रोजी तिसरे उभे रिंगण व पादुका आरती होणार आहे.
काय आहे गोल रिंगण?
गोल रिंगणामध्ये पालखीभवती नागरिक मानवी साखळी करून फेर धरतात. त्यानंतर दोन मानाचे घोडे गोलाकार फिरतात मात्र यामध्ये एकच घोडेस्वार असतो. दुसर्या घोड्यावर संत तुकाराम स्वार असतात असा वारकर्यांचा विश्वास आहे. त्यानंतर या गोलाकार रिंगणा भोवतालची माती उचलण्यासाठी वाराकर्यांची गर्दी असते. त्यानंतर उभ्या रिंगणादरम्यान वारकरी सरळ रेषेत उभ्याने राहून उड्या मारतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune (City/Town/Village), Wari, Warkari