जळगाव, 28 जानेवारी : भाजपच्या (BJP) रावेरच्या खासदार आणि रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या नावाचा भाजपच्या वेबसाईटवर (BJP Website) चुकीचा उल्लेख केल्यामुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणावर रक्षा खडसे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत झालेल्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसंच, भाजपकडून ही चूक झाली नसावी, असा दावाही त्यांनी केला. जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत असताना रक्षा खडसे यांनी झालेल्या प्रकारावरून ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतली. ‘मला बुधवारी संध्याकाळी ही गोष्ट लक्षात आली आहे. भाजपकडून हे करण्यात आलेलं नाही. माझ्याकडे जे मेसेज आले आहे. त्यामध्ये ‘सेव्ह महाराष्ट्र फॉर्म बीजेपी’ या पेजवरून याचे स्क्रीन शॉट शेअर करण्यात आले आहे. हे पेज कोण चालवत आहे, ते माहिती नाही. या पेजवरून ही बातमी व्हायरल करण्यात आली आहे’ असा आरोप रक्षा खडसेंनी केला. धोकेबाज नवरा करणार होता तिसरं लग्न, हातात पडल्या बेड्या! ‘ही बातमी पाहिल्यानंतर मी भाजपची अधिकृत वेबसाईट चेक केली होती. त्यावेळी मला असं काही दिसलं नाही. पण काही जणांनी पेजचे स्क्रिन शॉट काढून फोटोशॉपने केले असले, असा माझा अंदाज आहे’ असंही रक्षा खडसे म्हणाल्या. ‘झालेल्या प्रकार हा वाईट आणि विचित्र होता. एका महिलेच्या संदर्भात कोणी विरोधक किंवा सत्ताधारी असेल अथवा तिथे कुणीही असेल त्यांनी हे व्हायरल करण्याची कोणतीही गरज नव्हती. एका महिला म्हणून, एका खासदारावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. त्यामुळे दु:ख वाटले’ अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. लाल किल्ल्यावर आंदोलक शेतकऱ्यांकडून बसची तोडफोड; संपूर्ण प्रकार VIDEO मध्ये कैद ‘या प्रकरणावर पोलीस चौकशी करत आहे, पक्ष सुद्धा यावर खुलासा करणार आहे. जे कोणी दोषी असतील त्यावर नक्की कारवाई केली पाहिजे, असंही रक्षा खडसे म्हणाल्या. भाजपच्या वेबसाईटवर हे दिसले आहे, मग चुकू कुणाची असावी? असं विचारले असता रक्षा खडसे म्हणाल्या की, ‘जेव्ही मी पाहिलं त्यावेळी मला असं काही दिसलं नाही. तेव्हा ते रावेरचं होतं. पण काही जणांचं म्हणणं होतं की, रावेरचं हिंदी ट्रान्सलेट केल्यावर तसा शब्द वापरला गेला.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







