जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / धोकेबाज नवरा करणार होता तिसरं लग्न, बायकोच्या सतर्कतेमुळे हातात पडल्या बेड्या!

धोकेबाज नवरा करणार होता तिसरं लग्न, बायकोच्या सतर्कतेमुळे हातात पडल्या बेड्या!

धोकेबाज नवरा करणार होता तिसरं लग्न, बायकोच्या सतर्कतेमुळे हातात पडल्या बेड्या!

दोन लग्न झालेली असूनही तिसरं लग्न (Third Marriage) करण्याचा प्रयत्न बायकोच्या सतर्कतेनं उधळला गेला आहे. हा धोकेबाज नवरा (Husband) त्याच्या दोन बायका आणि मुलांची फसवणूक करुन तिसरं लग्न करणार होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

अहमदाबाद, 28 जानेवारी :  दोन लग्न झालेली असूनही तिसरं लग्न (Third Marriage) करण्याचा प्रयत्न बायकोच्या सतर्कतेनं उधळला गेला आहे. हा धोकेबाज नवरा (Husband)  त्याच्या दोन बायका आणि मुलांची फसवणूक करुन तिसरं लग्न करणार होता. तो ज्या महिलेशी लग्न करणार होता, तिला त्याचा संशय आला. त्यानंतर तिनं होणाऱ्या नवऱ्याच्या पहिल्या पत्नीशी संपर्क केला आणि हे सर्व प्रकरण उघड झालं. काय आहे प्रकरण? गुजरात (Gujarat) मधील अहमदाबादची (Ahmedabad) ही घटना आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार मूळच्या जुनागडच्या पण आता अहमदाबादमध्ये राहणाऱ्या महिलेनं तिचा धोकेबाज नवरा राजेश याच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. राजेशचं या महिलेशी 14 डिसेंबर 1999 रोजी लग्न झालं होतं. त्यांचा 21 वर्षांचा संसार असून त्यांना दोन मुलं देखील आहेत. राजेशनं यापूर्वीच इंदूरच्या महिलेशी दुसरं लग्न केलं होतं. त्यानंतर तो जबलपूरच्या एका मुलीशी खोट्या कागदपत्रांच्या मदतीनं तिसरं लग्न करणार होता. यासाठी त्यानं लग्न लावणाऱ्या वेबसाईटशी (Matrimonial) संपर्क साधला होता. राजेशच्या होणाऱ्या बायकोला संशय आल्यानंतर तिनं राजेशची सखोल चौकशी केली. त्यावेळी त्याचं यापूर्वीच लग्न झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर तिनं लग्न करण्यास नकार दिला तसंच त्याच्या पहिल्या पत्नीशी संपर्क साधून तिला या सर्व प्रकरणाची माहिती दिली. पहिल्या पत्नीला या सर्व प्रकरणाची माहिती समजताच तिनं याची पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर अहमदाबादच्या वस्त्रपूर पोलिसांनी राजेशला ताब्यात घेतलं आहे. राजेश लग्नानंतर व्यवसायाच्या निमित्तानं सतत घराच्या बाहेर राहत असे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात