जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Raj Thackeray : ठाकरे गट, मनसे एकत्र येणार? विधानसभा निवडणुकीबाबत राज ठाकरे स्पष्टच बोलले

Raj Thackeray : ठाकरे गट, मनसे एकत्र येणार? विधानसभा निवडणुकीबाबत राज ठाकरे स्पष्टच बोलले

युतीवर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

युतीवर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असा सूर काही दिवसांपासून मनसे कार्यकर्त्यांमधून उमटत आहे. यावर आता राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

रत्नागिरी, 14 जुलै, शिवाजी गोरे :  मनसेप्रमुख राज ठाकरे हे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. दापोलीमध्ये भरपावसात कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. यावेळी राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद देखील साधला. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र यावं असा सूर गेल्या काही दिवसांपासून मनसे कार्यकर्त्यांमधून उमटत आहे. अखेर आज यावर राज ठाकेर यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेनंतर युतीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?  राज ठाकरे यांना युतीबाबत प्रश्न  विचारला असता त्यांनी युतीची शक्यता फेटाळून लावली आहे. मी एकला चलोची भूमिका घेणार आहे. लोकसभा विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार असल्याची मोठी घोषणा राज  ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. राज्यात सध्या हम करे सो कायदा अशी परिस्थिती आहे. राजकारण किती गलिच्छ होतं ते पहावं. जनता शांत बसल्याचा फायदा घेतला जात आहे. सध्या संघटनेत बदल करण्यासाठी मी दौऱ्यावर आहे. मनसे कोणासोबतही युती करणार नाही. विधासनभा आणि लोकसभेच्या जागा स्वतंत्र्यपणे लढवू असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात