मुंबई, 24 ऑक्टोबर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये ( Lilavati Hospital mumbai) उपचार करण्यात आले आहे. राज ठाकरे यांची आईचा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. उपचाराअंती राज ठाकरे आणि त्यांची मोठी बहिण जयवंती ठाकरे-देशपांडे यांना लीलावती हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे. (Raj Thackeray corona test positive) दरम्यान राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी आपण लवकरात लवकर बरे व्हा, अशी प्रार्थना केली आहे. एवढंच काय तर क्लाईड क्रास्टो यांनी राज ठाकरे यांना लिहिलेल्या मास्कबाबतच्या पत्राची देखील आठवण करुन दिली आहे. क्रास्टो यांनी ट्विट केलं आहे.
'गेट वेल सून' राज ठाकरे जी,
— Clyde Crasto - क्लाईड क्रास्टो (@Clyde_Crasto) October 23, 2021
मी आपणांस एका पत्राद्वारे मास्क परिधान करण्याची विनंती केली होती.
तज्ञ नेहमी सांगतात की मास्क हे एक कवच आहे, जे आम्हाला कोरोनापासून सुरक्षित ठेवते.
आपणही आता मास्क परिधान करा.
आपण लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी माझी ईश्वर चरणी प्रार्थना#RajThackeray pic.twitter.com/i9TTj6XKqY
या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की, गेट वेल सून’ राज ठाकरे जी, मी आपणांस एका पत्राद्वारे मास्क परिधान करण्याची विनंती केली होती. तज्ञ नेहमी सांगतात की मास्क हे एक कवच आहे, जे आम्हाला कोरोनापासून सुरक्षित ठेवते. आपणही आता मास्क परिधान करा. आपण लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी माझी ईश्वर चरणी प्रार्थना. क्लाईड क्रास्टो यांनी काय लिहिलं होतं पत्रात राजसाहेब, तुम्ही लोकांसाठी एक प्रेरणा आहात, आपण जे बोलता त्या प्रत्येक शब्दाचं पालन आणि अनुकरण केलं जातं. आपला एका मोठा चाहता वर्ग आहे. आपण त्यांचे गुरू, मित्र आणि मार्गदर्शक आहात. आपली भाषणं केवळ महाराष्ट्रातचं नव्हे तर संपूर्ण देशात पाहिली जातात. त्यामुळे कोविड विरुद्धच्या लढाईत आपली भूमिका फार महत्त्वाची ठरते. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो, की राजसाहेब तुम्ही मास्क घाला. केवळ तुमच्या अनुयायांसाठीच नव्हे, तर देशातील इतर नागरिकांसाठीही एक उदाहरण ठेवा. हेही वाचा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सणासुदीआधी केंद्रानं राज्यांना केलं अलर्ट; जारी केली मार्गदर्शक तत्वे क्लाईड क्रास्टो यांनी 6 मार्च 2021 रोजी राज ठाकरेंना पत्र पाठवलं होतं. राज ठाकरे यांच्या घरी कोरोनाचा शिरकाव राज यांच्या आई आणि बहिण जयवंती ठाकरे-देशपांडे यांना कोरोनाची लागण झाली होती. राज ठाकरे आणि त्यांच्या बहिणीची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे दुपारी ते लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांच्यावर उपचार पूर्ण झाल्यानंतर रात्री घरी सोडण्यात आलं. आरोग्य चाचणी पूर्ण करून राज ठाकरे हे कृष्णकुंज बंगल्याकडे रवाना झाले. हेही वाचा- ‘‘पोलिसांनी हिरोईन नाही तर…‘‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी NCB वर साधला निशाणा
लीलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, राज यांच्या आईंची तब्येत आता ठीक असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहे. राज ठाकरे यांच्यावर लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहे. ताप कमी झाला आहे, खोकल्याचा कोणताही त्रास त्यांना नाही. श्वास घेण्यासाठीही कोणताही त्रास त्यांना जाणवत नाही. हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना फोन दरम्यान, राज यांच्यासह त्यांच्या आई आणि बहिणीला कोरोनाची लागण झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी संध्याकाळी राज ठाकरे यांना फोन केला होता. मुख्यमंत्र्यांनी राज यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्याचबरोबर राज यांच्या आई आणि बहिण जयंवती ठाकरे देशपांडे यांच्या प्रकृतीचीही विचारपूस केली. ठाकरे कुटुंबातला हा भावनिक क्षण होता. राजकीय मतभेद दूर ठेवून दोन्ही भाऊ एकत्र आल्याचे पाहण्यास मिळाले.

)







